
दोंडाईचा ते धुळे व्हाया विरदेल - शिंदखेडा मार्गे बस सेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी....
(विरदेल प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)
शिंदखेडा तालुक्यातील राज्य क्र ६ वरील विरदेल, चिलाने, धमाणे, बाम्हणे येथील जवळ पास ३० ते ३६ हजार लोकसंख्या असलेल्या नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी धुळे येथे जाण्यासाठी डायरेक्ट ची बस सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना टप्पा टप्पा ने व जीवाचे हाल करत प्रवास करावा लागत असल्याने वेळेचा अपव्यय होत असून अनेक मानसिक शारीरिक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने महामंडळाने याकडे लवकरात लवकर लक्ष घालून या मार्गावर बसेस सुरू कराव्यात यावी अशी मागणी या परिसरातील व विरदेल येथील नागरिकांकडून होत आहे..
सध्या चिमठाणे मार्गे दिवसातून शेकडो बसेस ये जा करीत असून त्या पैकी काही बसेस प्रवाशांच्या सोयी साठी विरदेल मार्गे सुरू केल्यास प्रवाशांची सोय होणार असून महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नात अधिक भर होणार आहे .या संदर्भात उपमहाव्यस्थापक वाहतूक मुंबई परिवहन मंत्री यांना ही निवेदन पाठविले असून त्यांनी धुळे विभाग नियंत्रक यांच्या कडे पाठविले आहे तरी वरिष्ठांनी याचा सहानुभूती पूर्वक विचार करावा अशी मागणी विरदेल गावातील व परिसरातील नागरिकांनी त्याच बरोबर विरदेल प्रवाशी संघटना श्री.दिनेश बडगुजर, पत्रकार–राकेश बेहेरे पाटील, सरपंच सुवर्णा पाटील, जितेंद्र पेंढारकर, पवन बेहेरे, डॉ.सोनू जोशी यांनी केली आणि त्याच बरोबर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मागणी केली आहे