केळगांव येथे श्री खंडोबाचे लग्न सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला
केळगाव येथे श्री खंडोबा देवाचा पारंपरिक लग्न सोहळा उत्साहात संपन् :
माघ पौर्णिमेनिमित्त समस्त ग्रामस्थ केळगाव, ता. खेड केळगाव यांच्या वतीने परंपरेनुसार श्री खंडोबा रायाचा लग्न सोहळा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडला. दरवर्षी रितीप्रमाणे आयोजित होणाऱ्या या सोहळ्यासाठी पंचकोशीतील भाविक मोठ्या संख्येने केळगाव येथे दाखल झाले होते.
श्री खंडोबा देवाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. लग्न सोहळ्यानंतर महाप्रसाद, तळी–भंडारा व अन्नदानाचा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि आनंदात पार पडला. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे व स्वयंसेवकांच्या नियोजनामुळे सर्व कार्यक्रम सुरळीतरीत्या पार पडले.
या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण केळगाव परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून, ग्रामस्थांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.