logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साताऱ्यात उद्घाटन शालेय शिक्षणात मराठीच अनिवार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सातारा, दि. २ : राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा राहील. इतर कोणतीही भारतीय भाषा सक्तीची नसेल, त्या ऐच्छिक स्वरूपात असतील. इतर भाषा कोणत्या इयत्तेपासून सुरू करायच्या, याबाबतचा निर्णय डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर घेतला जाईल, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
सातारा येथील शाहू स्टेडियममध्ये आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती महाराष्ट्राचा आत्मा असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी संमेलनाच्या उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. मृदुला गर्ग, स्वागताध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, माजी अध्यक्ष डॉ. ताराबाई भवाळकर, आमदार अतुल भोसले, मनोज घोरपडे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मराठी साहित्याच्या परंपरेचा गौरव करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संत परंपरा, वारकरी साहित्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला प्रशासकीय दर्जा यामुळे मराठीची ओळख अधिक दृढ झाली. केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला असून, आता मराठीच्या विकासासाठी ठोस पावले उचलली जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
साहित्य क्षेत्रात कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही देत साहित्य हे समाजाच्या जाणिवा विस्तारण्याचे माध्यम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सातारा जिल्ह्याने आजवर मराठी साहित्याला दिलेल्या योगदानाचा विशेष उल्लेखही त्यांनी केला.
संमेलनाच्या उद्घाटक डॉ. मृदुला गर्ग यांनी मराठी साहित्याचा राष्ट्रीय पातळीवरील प्रभाव अधोरेखित केला. अध्यक्षीय भाषणात विश्वास पाटील यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी साहित्याला नवी

11
302 views

Comment