logo

ठाणे महानगरपालिका निवडणूक : सामान्य नागरिक विकास पोहरकर यांची उमेदवारी वैध, पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा

ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सामान्य नागरिक म्हणून अर्ज दाखल केलेल्या विकास पोहरकर यांच्या उमेदवारीला आज मोठे यश मिळाले आहे.
आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी त्यांचा अर्ज अधिकृतरित्या वैध ठरवण्यात आला असून, त्यांना त्यांच्या पक्षाकडून अधिकृत पुरस्कृत उमेदवार घोषित करण्यात आले आहे.
यासोबतच विकास पोहरकर यांना पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्हही प्रदान करण्यात आले आहे. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

4
230 views