logo

बिबट्याची चाहूल….आशागड ग्रामस्थ भयभीत….!!!

डहाणू ०४/०१/२०२६ -: संपूर्ण महाराष्ट्रात सध्या बिबट्याच्या गावात येण्याच्या भीतीने वातावरणान भयभीत झालेले आहे. लोकांमध्य भिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तर बिबट्याने लोकवस्तीत हल्ले केल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे . बिबट्याला जणू माणसाच्या रक्ताची चटक लागलेली दिसत आहे असे वाटते! .
डहाणू रेल्वे स्टेशनपासून अगदी नजीक असलेले गाव आशागड , या गावतही काही दिवसापासून बिबट्या गावात येण्याची बातमी झपाट्याने पसरलेली दिसत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वायरल बातमीमुळे गावातील काही लोकांनी ओपन खिडक्या किव्हा दरवाजे मध्य ग्रील, लोखंडी तार जाळी लावण्याचे काम सुरू केले आहे असे समजत आहे . गावामधील संतोष उंबरसाडा या ग्रामस्ताची विचारपूस केली असता, असे समजले की बिबट्या येण्याच्या भीतीने त्यांच्या घराच्या खिडक्यांना लोखंडी जाळी त्यांनी बसवली आहे , असे समजले आहे. संतोष उंबरसाडा यांच्याशी बोलल्यावर असे माहीत होते की, लोकांमध्ये खूप भीती निर्माण झाली आहे. लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी प्रशासन यावर काय ठोस भूमिका घेत आहे ते आपण बघणार आहोत.!!!!!!

49
3721 views