logo

शिक्षणमंत्री दादा भुसे यांची सभा नाशिक पोलिस प्रशासनाच्या कडक बंदोबस्तात पार

प्रतिनिधी ०४ जानेवारी (नाशिक) :- आज सायंकाळी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांची जाहीर सभा अंबड सातपूर लिंक रोडवरील भोर टाऊनशिप या ठिकाणी झाली. सभेच्या वेळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नाशिक पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याचे आयोजन अंबड पोलीस स्टेशन अंकित एमआयडीसी पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे आणि पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी रस्त्यावरती वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये म्हणून पोलीस कटिबद्ध होते. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन होऊ नये यासाठी दक्षता घेत होते.

16
1040 views