अपक्ष उमेदवार जीवन दिघोळे यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ
प्रतिनिधी ०४ जानेवारी (नाशिक) :- प्रभाग क्रमांक २७ (ड) चे अपक्ष उमेदवार जीवन दिघोळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात आला. त्याचबरोबर आज प्रभागामध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून त्यांनी शक्ती प्रदर्शन करून दाखवले. प्रभागामधील अनेक समस्यांवर मतदारांनी अपक्ष उमेदवार जीवन दिघोळे यांच्याशी संवाद साधला. यादरम्यान निवडून आल्यानंतर प्रभागाचा विकास करेन असे आश्वासन दिले. प्रभागामध्ये फिरुन त्यांनी प्रभागाची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी रस्ते, पाणीटंचाई, अस्वच्छता अशा अनेक समस्या त्यांच्या निदर्शनास आल्या. त्यामुळे त्यांनी याच बाबींचा विचार करून त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला अशी माहिती अपक्ष उमेदवार जीवन दिघोळे यांनी दिली.