logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जनकल्याण समाज उन्नती पत्रकार संघटनेची नुतन कार्यकारिणी जाहीर


चिखली :- चिखली शहर व चिखली तालुक्यातील छोटे-मोठे ग्रामीण भागातील पत्रकारांची एकजूट व्हावी व छोट्या मोठ्या ग्रामीण भागातील पत्रकारांना निर्भयपणे लिखाण, स्वतंत्र प्रदान व्हावे व जनसामान्य पत्रकारांची गळचेपी होऊ नये म्हणून जनकल्याण समाज उन्नती पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली सदर पत्रकार संघटनेची चिखली तालुका नुतन कार्यकारणीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक दिनांक 01/01/2026 रोजी सकाळी 11 : 30 वाजता आशीर्वाद मंगल कार्यालय सवणा फाटा चिखली येथे घेण्यात आली सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद पवार हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय जगदीश जयस्वाल यांची उपस्थिती होती तसेच या बैठकीमध्ये चिखली शहर व चिखली तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांचे भव्य संघटन उभारण्यात यावे या मुद्द्यावर साधक-बाधक चर्चा करण्यात आली व प्रत्येक पत्रकारास शासनाने समसमान धोरणाप्रमाणे वर्तणूक द्यावी तसेच समाज जीवनातील विविध प्रश्नांसाठी सदर संघटनेच्या सभासदांनी तन- मन-धनाने झटावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले तसेच जनकल्याण समाज उन्नती पत्रकार संघटनेची चिखली तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये जनकल्याण समाज उन्नती पत्रकार संघटनेचे चिखली तालुका अध्यक्ष शेख.कदीर शेख.शब्बीर, कार्याध्यक्ष प्रशांत जैवाळ उपाध्यक्ष निलेश कोल्हे,सचिव सिद्धेश्वर देव्हरे, सहसचिव शहबाज शेख, संघटक हर्सिंग छर्रे, सहसंघटक जाकीर खान,कोषाध्यक्ष राधेश्याम काळे,सदस्य सौ.उमाताई जैवाळ ,मेघाताई जाधव, विशाल गवई ,सागर जाधव,अस्लम हिरीवाले,दिलीप हतागळे, सैय्यद वसिम,प्रविण डोंगरदिवे, गोविंद बोरा यांची चिखली तालुका कार्यकारणी मध्ये सर्वानुमते निवड करण्यात आली.

28
1695 views

Comment