logo

बाळराजे आवारे पाटील यांच्या कडून मुख्य निवडणूक अधिकारी, राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र निवडणुकांमध्ये EVM ऐवजी मतपत्रिके द्वारे मतदान प्रक्रिया घ्यावी

मुख्य निवडणूक अधिकारी,
राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र
मुंबई -४०००३२.

विषय:-आपल्याद्वारे देशाचे संविधान मजबूत ठेऊन आपली लोकशाही भविष्यात शाबूत रहावी याकरिता येथून पुढील निवडणुकांमध्ये EVM ऐवजी मतपत्रिके द्वारे मतदान प्रक्रिया राबवावी यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने सदरील निवेदनाद्वारे करत असलेल्या तक्रारीबाबत..

महोदय,
वरील विषयाच्या अनुषंगाने मतदारांच्या‌ भावनांचा आदर ठेऊन धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने सदरील निवेदनाद्वारे खालीलप्रमाणे तक्रार देत आहोत की,आपल्या मतदारांमधून प्रत्येक निवडणूक निकालानंतर निवडणूक प्रक्रियेमध्ये वापरण्यात येणाऱ्या EVM मशीन बाबत अनेक शंका उपस्थितीत होत आहेत व त्यामुळे आपल्या देशाचे संविधान धोक्यात असून लोकशाही संपत असल्याची जनभावनां लोकांच्या मनी व ह्रदयी निर्माण होत असल्या कारणाने येथून पुढे आपणाद्वारे राबविण्यात येणारी प्रत्येक निवडणूक प्रक्रिया हि EVM ऐवजी मतपत्रिके द्वारेच पार पाडण्यात यावी जेणेकरून मतदारांमध्ये संविधान व लोकशाही बाबत विश्वासार्हता निर्माण होईल आणि हे पणं तितकेच खरे आहे की जगामधील कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमध्ये फेरफार केला जाऊ शकतो कारणं ती एक मानव निर्मित वस्तू आहे म्हणूनच टेक्नॉलॉजी मध्ये आपल्या देशापेक्षा अनेक पटीने प्रगल्भता असणारे देशसुध्दा निवडणूक प्रक्रियेत EVM ऐवजी मतपत्रिकेचा वापर करूनच निवडणूक प्रक्रिया राबवतात आणि आपणं जगामधील सर्वात मोठी लोकशाही म्हणवून घेत EVM सारख्या मॅन्युप्लेट होऊ शकणाऱ्या मानव निर्मित इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचा वापर करून मतदारांच्या मनाशी व भावनेशी खेळून आपल्या देशाचे संविधान व लोकशाही संपत असल्या बाबतची शंका व प्रश्नचिन्हे जगामध्ये निर्माण होऊ देत आहोत त्यामुळे हे सर्व प्रकार येथून पुढील काळात थांबवण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने आपणास सदरील निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की निवडणूक आयोगाच्या वतीने संघटनेला लेखी आश्वसित करावे की येथून पुढील प्रत्येक निवडणूक प्रक्रिया हि EVM ऐवजी मतपत्रिके द्वारेच राबविण्यात येईल जोपर्यंत निवडणूक आयोग जनसामान्य मतदारांच्या व विरोध पक्षाच्या मागणीनुसार निवडणूक प्रक्रियेत EVM सारख्या मॅन्युप्लेट करता येऊ शकणाऱ्या वस्तूचा वापर थांबवून निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणू पाहत नाही तोपर्यंत प्रतिष्ठानच्या वतीने अठरा पगड जातीतील मतदारांना सोबत घेऊन येणार्या दिवसांमध्ये आमरण उपोषण करत जन आंदोलन उभा करण्याचा निर्णय प्रतिष्ठानच्या वतीने घेत आहोत कृपया याची नोंद निवडणूक आयोगाने घ्यावी हि नम्र विनंती.
आपले नम्र,
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडा, महाराष्ट्र राज्य.

15
1168 views