logo

मराठी पत्रकार दिनानिमित्त ‘एआय आणि माध्यमे’ विषयावर ऑनलाईन व्याख्यान

जळगाव (दि. ०५) — माध्यमविश्व झपाट्याने बदलत असताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) पत्रकारितेवरील प्रभाव समजून घेण्यासाठी मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून मंगळवार दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता “कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि माध्यमे” या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यासह महाराष्ट्रातील नऊ विद्यापीठांच्या जनसंवाद व पत्रकारिता विभागांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. डॉ. सदानंद मोरे राहणार असून, प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार डॉ. धनंजय बिजले व प्रा. डॉ. योगेश बोराटे हे मार्गदर्शन करणार आहेत.
या ऑनलाईन व्याख्यानात जळगाव, नागपूर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, मुंबई, नांदेड व गडचिरोली येथील विद्यापीठांचा सहभाग असून विद्यार्थ्यांनी, संशोधकांनी व पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
ऑनलाईन सहभागासाठी झूम लिंकवर जॉइन करावे. अधिक माहितीसाठी डॉ. गोपी सोरडे (मो. ९८३४१६६०७२) यांच्याशी संपर्क साधावा.

13
444 views