logo

मौजे काशिलिंगेश्वर नगर, कासारगाव, बोरवटी व खुलगापूर येथील शेतकऱ्यांच्या वतीने मा.गटविकास अधिकारी, लातूर यांना दिले निवेदन..‌*📝

*मौजे काशिलिंगेश्वर नगर, कासारगाव, बोरवटी व खुलगापूर येथील शेतकऱ्यांच्या वतीने मा.गटविकास अधिकारी, लातूर यांना दिले निवेदन..‌*📝

मौजे काशिलिंगेश्वर नगर, कासारगाव, बोरवटी व खुलगापूर *येथील शेतकऱ्यांच्या शेतीत लातूर शहराचे दूषित पाणी, घनकचरा व विषारी रसायन मिश्रित सांडपाणी येत असल्यामुळे होणारे शेतीचे, शेतमालाचे प्रचंड व अपरिमित नुकसान यावर तातडीने कार्यवाही करून कायमस्वरूपी तोडगा काढणेबाबत आज पंचायत समितीचे मा.गट विकास अधिकारी श्री.श्याम गोडभरले साहेब यांना निवेदन देण्यात आले.*
वरील गंभीर समस्येबाबत *उपरोक्त गावच्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी सन २०१६ पासून ते आजपर्यंत मा.जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका व तहसिलदार, लातूर यांना निवेदने दिली आहेत परंतु त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांमार्फत यावर अद्याप पर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही* हि *अतिशय खेदाची बाब* आहे
लातूर शहराच्या संपूर्ण भागातून येणारे व गाव भागातून येणारे *सांडपाणी, महानगरपालिकेचा घनकचरा, प्लास्टिक बॉटल्स, प्लास्टिक कॅरिबॅग, इंजेक्शन निडल्स व सुया आणि अजुन बरेच काही* हे डी-मार्ट जवळील वाहणाऱ्या नाल्यातून *तसेच एम आय डी सी येथून येणारे विषारी व औद‌योगिक सांडपाणी* हे प्रचंड प्रमाणात *वरील गावच्या शेतकऱ्यांच्या शेतात येते त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतजमीन नापीक बनत चाललेली आहे तसेच मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान होत आहे व शेतातील संपूर्ण माती वाहून जात आहे. शेतजमीन विषारी बनत असून ती नापीक होण्याच्या मार्गावर आहे. हे दूषित पाणी पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळून गावातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहे.*
या वरील समस्यांची तीव्रता पाहता या गंभीर समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. हे नैसर्गिक संकट नसून, मानवनिर्मित आपत्ती आहे ज्यासाठी थेट महानगरपालिका व जिल्हा प्रशासन जबाबदार आहे. *या समस्येवर तात्काळ व काहीतरी ठोस उपाययोजना करण्यासाठी आज काशिलिंगेश्वर नगर ग्रामपंचायतचे संस्थापक तथा निर्माते ॲड.किरण बडे यांच्या नेतृत्वाखाली* लातूर पंचायत समितीचे मा.गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. *याप्रसंगी काशिलिंगेश्वर नगर, कासारगाव, बोरवटी व खुलगापूर गावातील प्रताप गोरे, ॲड.योगेश बनसुडे, परमेश्वर माने, आकाश जमादार, विश्वनाथ जगताप, शिवाजी काराडे, सुरेश काराडे, ईश्वर प्रसाद चांडक, देविदास कदम, वामन रणखांब, महादेव टेकाळे, रामभाऊ रणखांब, बालाजी भातलवंडे, सतीश रणखांब, व्यंकट शिंदे* आदींसह नुकसान ग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

36
2658 views