logo

*गोखले एज्युकेशन संस्थेच्या, नाशिकरोड बिटको महाविद्यालयात २९ व्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय स्पर्धा.

*गोखले एज्युकेशन संस्थेच्या, नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात २९ व्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय २९ वी काव्यवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न!*
नाशिक: महाविद्यालयात उदयोन्मुख कवींनी समाज मन वाचायला शिकलं पाहिजे, वर्तमानाची जाणीव त्यांनी आपल्या कवितेतून बोलती केली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने कवितेला न्याय मिळेल असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत तथा साहित्यिक केशव देशमुख यांनी केले.
गोखले एज्युकेशन संस्थेच्या, नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात २९ व्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेचे उद्घाटन डॉ. देशमुख यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. कृष्णा शहाणे, उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, डॉ. सतीश चव्हाण ,मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. के एम लोखंडे, प्रा. डॉ. आजिनाथ नागरगोजे, आधी उपस्थित होते.
देशमुख पुढे म्हणाले की, केवळ स्पर्धेसाठी लिहिणे म्हणजे कावी निर्मितीची प्रेरणा नव्हे, एक व्यापक असे समाजभान कवितेतून निर्माण झाले पाहिजे आणि त्यासाठी, महापुरुषांच्या प्रेरणा आवश्यक असून त्याचे प्रतिबिंब आपल्या व्यक्तिमत्वातून आणि काव्यातूनही उमटले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. काव्यातून येणारे समाजभान हे वर्तमानाला अपेक्षित असते आणि त्याची निर्मिती उदयोन्मुख कवींनी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित काव्य स्पर्धकांना केले.
या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मुंबई, नाशिक, तसेच नाशिक जिल्ह्यातील नामपुर, सटाणा, इत्यादी विभागातील महाविद्यालयाचे वेगवेगळे संघ काव्यवाचन स्पर्धेसाठी सहभागी झाले होते.
या काव्यवाचन स्पर्धेचा फिरता चषक नामपुर येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. सुवर्णा लहांगडे,
व कुमारी दुर्गा पटांगडे यांनी पटकावला. प्रथम पारितोषिक एन.बी.टी लॉ कॉलेज नाशिक येथील मेघा सुनील निकम, द्वितीय क्रमांक बी.वाय.के कॉलेज ऑफ कॉमर्स नाशिक, तृतीय क्रमांक कु.अक्षदा सागर वालखे, लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान महाविद्यालय पंचवटी, तर उत्तेजनार्थ पारितोषिक दिपाली रमेश गोसावी सिडको महाविद्यालय नाशिक, ज्ञानदीप गणेश पवार डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी, नागपूर यांना मिळाले.
या काव्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध कवी डॉ.सागर चौधरी, सुप्रसिद्ध कवी रत्नदीप जाधव, यांनी काम पाहिले.
डॉ. के .एम.लोखंडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून काव्यस्पर्धेचा आजवरचा इतिहास आणि त्या पाठीमागची भूमिका विशद केली.
प्राचार्य डॉ. शहाणे,डॉ. पठारे, डॉ.नागरगोजे, आदींनी मनोगत व्यक्त केले. दिवसभरात एकूण तीन सत्रांमध्ये काव्यस्पर्धा घेण्यात आली त्यातील पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अमर ठोंबरे यांनी तर दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन, डॉ. अर्चना घोडके यांनी, परीक्षकांचा परिचय प्रा. वृषाली उगले यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.आरती गायकवाड यांनी करून दिला.
तिसऱ्या आणि समारोपाच्या सत्राचे सूत्रसंचालन डॉ.उत्तम करमाळकर यांनी केले. आभार प्रा..राजेश बागुल,प्रा. राजाराम तराळ यांनी मानले. या स्पर्धेसाठी मराठी विभागातील प्रा. डॉ. गीतांजली चिने, डॉ. शरद नागरे, स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले

115
3129 views