logo

समाजाला दिशा व देशाला सशक्त करण्यासाठी पत्रकारीता करावे - जिल्हा पोलीस अधिक्षक नुरूल हसन भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघात पत्रकार दिन साजरा

समीर नवाज़ भंडारा ,
भंडारा : पत्रकारीता लोकशाहिचा चौथा स्तंभ असून यात पत्रकारांची महत्वाची भुमीका असते. पत्रकार आपल्या लिखाणातून समाजाला आरसा दाखवतो. समाजाला दिशा व देशाला सशक्त करण्यासाठी पत्रकारीतेच्या माध्यमातून पत्रकारांची महत्वाची भुमीका असते. असे प्रतिपादन भंडारा जिल्हा पोलीस अधिक्षक नुरूल हसन यांनी केले.
ते भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने ६ जानेवारी ला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरण म्हणून पत्रकार भवन येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधिक्षक नुरूल हसन होते. प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, सचिव मिलींद हळवे, कोषाध्यक्ष डी. एफ. कोचे, उपाध्यक्ष राकेश चेटूले, वरिष्ठ पत्रकार गोपालकृष्ण मांडवकर, लोकमत समाचार चे शशी वर्मा, कॉम्रेड हिवराज उके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून द्विप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रास्ताविक चेतन भैरम यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले नियतकालिक दर्पण सुरू केले. त्यांच्या स्मरणात पत्रकार दिनाचे महत्व सांगून काळानुरूप पत्रकारांनी बदलावे असा सल्ला दिला. मार्गदर्शन करतांना वरिष्ठ पत्रकार हिवराज उके यांनी देशामध्ये पत्रकारांची गळचेपी होत असून अनेक समस्यांचा सामना पत्रकार बंधू करीत असल्याची खंत व्यक्त केली. तर गोपालकृष्ण मांडवकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यात दर्पण सारख्या वृत्तपत्राचे योगदानाबद्दल सविस्तर माहिती देवून पहिलेची पत्रकारीता व विद्यमान काळातील पत्रकारीतेबद्दल रोखठोक मत मांडले.
स्पर्धा परिक्षेकरीता यशस्वी व्हायचा असेल तर दररोज विद्यार्थ्यांनी वर्तमान पत्राचे वाचन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. आज अनेक पत्रकार पवित्र पत्रकारीता करीत आहेत. तर काही पत्रकार विशुद्ध पत्रकारीता करून पत्रकार मर्यादा ओलांडत असल्याने जनसामान्यांच्या विश्वासाला तडा जात आहे. तेव्हा पत्रकारांनी मर्यादा ओलांडू नये असे प्रांजळ मत नुरूल हसन यांनी मांडले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजू आगलावे, समशेर खान, कु. चेतना उके, अजय मेश्राम, समीर नवाज, अनमोल मेश्राम, विलास केजरकर, चंद्रकांत श्रीकोंडावार यांनी विविध विषयांवर उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन पत्रकार संघाचे कार्यकारी सदस्य प्रा.बबन मेश्राम यांनी केले. तर उपस्थितांचे आभार मिलींद हळवे यांनी मानले.
यावेळी सय्यद जाफरी, मुकेश मेश्राम, राकेश श्यामकुवर, निश्चल येनोरकर, सुरज परदेशी, राहूल थोटे, यशवंत थोटे, विरेंद्र गजभिये, प्रमोद नागदेवे, संजू जयस्वाल, संजय भोयर, सुरेश कोटगले, प्रशांत देसाई, स्वप्नील मेश्राम, विजय क्षीरसागर, ब्रम्हदास बागडे, नितीन कुथे, अरहान खान, प्रविण तांडेकर, उमेश जांगळे, युवराज गोमासे, देवाजी मेश्राम, राहूल मेश्राम, ललीत बाच्छील, मनोहर मेश्राम, शशीकांत भोयर, काशिनाथ ढोमणे, पृथ्वीराज बन्सोड, दिलीप देशमुख, वामनराव चांदेवार, विजय खंडेरा, देवानंद नंदेश्वर, दिनेश भुरे, गोवर्धन गोटाफोडे, धम्मपाल मेश्राम, शैलेश हुमणे, जयकृष्ण बावनकुळे, विलास सुदामे, दिपक वाघमारे, सुरज निंबार्ते, अनिल रहांगडाले, विवेक चटप सह ग्रामीण व शहरातील पत्रकार बर्‍याच संख्येने उपस्थित होते.

61
1061 views