रायपूर पोलीस ठाण्यात ‘पत्रकार दिन’ उत्साहात साजरा; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश सोळंके यांनी केला पत्रकारांचा सत्कार
रायपूर पोलीस ठाण्यात ‘पत्रकार दिन’ उत्साहात साजरा; सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सोळंके यांनी केला पत्रकारांचा सत्कार
रायपूर: सादिक शाह प्रतिनिधी aima media news network
मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे व 'पत्रकार दिना'चे औचित्य साधून मौजे रायपूर पोलीस ठाण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रायपूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. निलेश सोळंके यांच्या हस्ते स्थानिक पत्रकार बांधवांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. समाजाचा आरसा म्हणून पत्रकार बजावत असलेले कार्य मोलाचे असून, पोलीस व पत्रकार यांच्यातील समन्वय सामाजिक शांततेसाठी आवश्यक असल्याचे मत यावेळी साळुंखे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला रायपूर परिसरातील पत्रकार बांधव आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या या सन्मानाबद्दल सर्व पत्रकारांनी आभार मानले.