logo

लोणी मॅरेथॉन 2026 चौथे पर्व उत्साहात संपन्न 21 किलोमीटर गटात आश्लेषा झोलेकर, निलेश यादव यांची विजयी दौड

लोणी(प्रतिनिधी)- तेजस वाळुंज

पुनीत बालन ग्रुप आणि माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी आयोजित लोणी मॅरेथॉन 2026 (चौथे वर्ष ) आज अतिशय उत्साहात संपन्न झाली. पुनीत बालन ग्रुप पुणे ,ऑक्झरीच पुणे हे या स्पर्धेचे प्रायोजक होते. संपूर्ण देशातून व महाराष्ट्रा मधून जवळपास 3500 स्पर्धकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला.
3 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10किलोमीटर आणि 21 किलोमीटर अशा चार प्रकारात पुरुष आणि महिला अशा विभागात ही स्पर्धा पार पडली. प्रत्येक स्पर्धकाला टी-शर्ट, चेस्ट नंबर बिब देण्यात आले तसेच प्रत्येकाला मेडल्स देऊन गौरविण्यात आले. स्पर्धकांच्या सुरक्षतेसाठी रूट वरती
हायड्रेशन पॉइंट , डॉक्टरांसहित अद्यावत मेडिकल फॅसिलिटी व मदतीसाठी रूट पायलेट सेवा देण्यात आली. या स्पर्धेत दिव्यांग स्पर्धकांचा सहभाग विशेष लक्षणीय होता. पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविज आणि खंडाळा येथीलही अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. अवर पोलीस अधीक्षक आणि आयर्न मॅन म्हणून प्रसिद्ध असणारे विष्णू ताम्हाणे, उपमुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी डॉ. अमर भडांगे, क्रीडामंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी सुनील पुणे िल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र करंजखेले दुबई आणि इटली या देशात मॅरेथॉन पूर्ण केलेले आयर्न मॅन डॉ. सागर गुजराती हे प्रमुख अतिथी आणि सहभागी म्हणून उपस्थित होते. लोणी मॅरेथॉन 2026 साठी अनेक उद्योजकांनी आर्थिक मोलाचे सहकार्य केले. जनकल्याण पतसंस्था लोणी, राजगुरुनगर सहकारी बँक, संभाजी पडवळ , हेमंत पडवळ, चेतन लोखंडे, रोहिदास वायाळ , अविनाश ढोबळे आणि सर्फराज मोमीन, संतोष वाळुंज , अनिल डोके त्याचप्रमाणे शाळेचे माजी विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी 350 स्वयंसेवकांनी व प्रतिनिधींनी उत्स्फूर्तपणे काम केले. याप्रसंगी राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्री किसन साहेब गायकवाड, माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयसिंह वाळुंज, महसूल विभागातील सहसचिव कैलास गायकवाड, प्रबोधिनीचे खजिनदार बाळासाहेब गायकवाड, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष पडवळ, प्रकाश वाळुंज पांडुरंग वाळुंज, नवनीत सिनलकर, प्रदीप कोचर याबरोबरच सर्व वर्तमानपत्राचे पत्रकार बंधू देखील उपस्थित होते. या स्पर्धेत वय 7 ते 72 या वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला हे विशेष. यावेळी लक्ष्मीबाई रामभाऊ गायकवाड, हरिश्चंद्र थोरात आणि भामाबाई मारुती वाळुंज यांना विशेष लक्षवेधी पुरस्कार देण्यात आला. ऋतुजा इंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मॅरेथॉनसाठी आवश्यक असे सांगितिक व्यायाम प्रकार करून घेतले. लोणी ग्रामपंचायत व ग्रामस्थ, विविध स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था , सामाजिक संस्था , संतोष पोखरकर , प्रकाश सिनलकर, सुधीर सोनार यांनी मोलाचे सहकार्य केले. पारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तम सहकार्य केले. सर्वांना ऑक्सीरीच पाणी, नाश्ता देऊन मॅरेथॉन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मॅरेथॉनचे संपूर्ण व्यवस्थापन रेस डायरेक्टर राजेश वाळुंज यांनी केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अविनाश वाळुंज आणि डॉ. मयूर लोखंडे यांनी केले.
*लोणी मॅरेथॉन 2026 चे विजेते पुढील प्रमाणे*
विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
*3 किमी मुली (वयोगट 11ते 18)*
प्रथम - आर्या मनोज डोके
द्वितीय - आदिती अभिजित भड
तृतीय - समृद्धी विजय जाधव
*3 किमी मुले (वयोगट 11 ते 18)*
प्रथम -संग्राम बबन शितोळे
द्वितीय -सत्यशील संदीप शितोळे
तृतीय - निकुंज अरविंद पारधी
*3किमी पुरुष (वयोगट 18 वर्षे वयापुढील)*
प्रथम - अभिषेक गुळविले
द्वितीय - जयदीप गायकवाड
तृतीय - विकास नाणेकर
*3 किमी महिला (18 वर्षे वयापुढील)*
प्रथम- सीमा नवनाथ वाळुंज
द्वितीय- उज्वला काळुराम डफळ
तृतीय- सारिका हरिश्चंद्र कापडे
*5 किमी (महिला)*
प्रथम- धनश्री राजगुडे
द्वितीय- सोनाली वाळुंज
तृतीय- सिद्धी वाळुंज
*5 किमी (पुरुष)*
प्रथम- आदिनाथ सोळंकी
द्वितीय- ओमप्रकाश यादव
तृतीय- जितेंद्र विधाटे
*5 किमी (महिला)*
प्रथम- अदिती हरगुडे
द्वितीय- ज्ञानेश्वरी लामखडे
तृतीय- स्वाती ढवळे
*10 किमी (महिला)*
प्रथम- प्रिया गुळवे
द्वितीय- आरती काळे
तृतीय- जयश्री ढोक
*10 किमी (पुरुष)*
प्रथम-महेश गायकवाड
द्वितीय- निरंजन सूर्यवंशी
तृतीय- प्रथमेश भोसले
*21 किमी (महिला)*
प्रथम- आश्लेषा झोलेकर
द्वितीय- गिरीजा मगर
तृतीय- संवेदना पाबळे
*21 किमी (पुरुष)*
प्रथम- निलेश यादव
द्वितीय- दयानंद चौधरी
तृतीय- आकाश शिंदे
*दिव्यांग स्पर्धक पुरस्कार*
शामल सूर्यवंशी
मीरा पाटील
*विशेष लक्षवेधी पुरस्कार*
लक्ष्मीबाई रामभाऊ गायकवाड
हरिश्चंद्र थोरात
भामाबाई मारुती वाळुंज

43
55 views