logo

दप्रण दिनानिमित्त प्रशालेत कार्यक्रमाचे आयोजन,


प्रतिनिधि:सब्दर शेख
जि.प.प्रशाला मुलांची पैठण येथे मराठी पत्रकारिता चे जनक  बाळशास्त्री जांभेकर यांची  जयंती व दर्पण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार,मदन आव्हाड ,दैनिक सूर्यवार्ता चे पत्रकार कलीम पटेल,यांचा पत्रकार दिनानिमित्त शॉल व पुष्प गुच्छ देऊन प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी मदन आव्हाड यांनी बालशास्त्री जाभेकर यांनी भारत देश स्वतंत्र्य करण्यासाठी आपल्या दर्पण दैनिकातून जनजागृती केली.इंग्रजा विरुध्द लढण्यासाठी भारतातील नागरिकांना जागरूक करण्याचे काम केले.पत्रकाराच्या कलमात किती ताकत असते ते दाखून दिले.
मुख्याध्यापक अंकुश गाढे यांनी सांगितले की मदन आव्हाड यांनी पैठण तालुक्यात एक आदर्श आणि चांगल्या प्रकारे पत्रकारिता केली आहे,पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, तळागाळातील अत्याचाराला वाचा फोडून न्याय देण्याचे काम आव्हाड यांनी केले आहे.
  अंकुश गाढे यांनी यावेळी दर्पण
दिनानिमित्त उपस्थित,सर्वांना शुभेच्छा दिल्या. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समशेर पठाण यांनी केले.तर शेवटी आभार दिलीप तांगडे यांनी मानले.
स्वागत गीत,गाऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. 
यावेळी प्रशालेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. राष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

16
208 views