logo

बातमीसाठी दहा वेळा फोन करणाऱ्या गोडबोल्या पुढाऱ्यांनी समाजसेवक दीपक वाल्हे यांचा आदर्श घ्यावा...*

*बातमीसाठी दहा वेळा फोन करणाऱ्या गोडबोल्या पुढाऱ्यांनी समाजसेवक दीपक वाल्हे यांचा आदर्श घ्यावा...*

अमळनेर, दि. ६ जानेवारी – मराठी पत्रकार दिनानिमित्त अमळनेर येथे डेबुजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालयाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात समाजसेवक तथा ग्रंथालयाचे अध्यक्ष दीपक वाल्हे यांनी पत्रकार बांधवांचा केलेला सन्मान सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. बातमी प्रसिद्धीसाठी पत्रकारांना दहा-वीस वेळा फोन करणाऱ्या आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतर दुर्लक्ष करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी दीपक वाल्हे यांचा हा आदर्श घ्यावा, अशी भावना पत्रकार बांधवांमध्ये व्यक्त होत आहे.लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखली जाणारी पत्रकारिता समाजातील वास्तव, अन्याय, विकासकामे आणि प्रशासनाची कामगिरी निर्भीडपणे मांडते. मात्र, निवडणुकीच्या काळात गोड बोलून बातमीसाठी पत्रकारांचा आधार घेणारे अनेक राजकारणी निवडणुका संपल्यानंतर त्यांना विसरतात, ही वास्तविकता दुर्दैवी आहे. अशा परिस्थितीत दीपक वाल्हे यांनी वर्षभर पत्रकारांशी सुसंवाद ठेवून, त्यांच्या कार्याचा आदर करून दरवर्षी सन्मान करण्याची परंपरा जपली आहे. हा सन्मान औपचारिक नसून, पत्रकारांच्या योगदानाबद्दलची खरी कृतज्ञता आणि विश्वासाचे प्रतीक आहे.या सोहळ्यात परिट धोबी समाजातील पत्रकार विकी जाधव आणि मनोज चित्ते यांचा संत गाडगेबाबा यांचे पुस्तक, लेखणी व बुके देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा चौकातील स्मारकाचे पूजन व माल्यार्पणाने झाली.प्रमुख उपस्थित पत्रकार ईश्वरजी महाजन, उमाकांत ठाकूर, यांचा ही समाजातील आदर्श पत्रकार म्हणुन सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक प्रकाश पाटील, प्रा. डॉ. रमेश माने, उपशिक्षिका दीपाली अमोल जाधव, परिट धोबी समाजाचे तालुकाध्यक्ष गंगाराम वाल्हे, शहराध्यक्ष रवींद्र जाधव आदी मान्यवर होते. युवा परिट धोबी मंडळाचे सहकार्य लाभले.दीपक वाल्हे पत्रकारांना केवळ बातमीचे माध्यम नव्हे, तर समाजपरिवर्तनातील भागीदार मानतात. त्यांच्या सूचनांना महत्त्व देतात आणि सहकार्य करतात. पत्रकारांचा सन्मान म्हणजे लोकशाहीचा सन्मान असल्याचे त्यांच्या कृतीतून दिसते. त्यामुळे इतर राजकारण्यांनीही कृतीतून पत्रकारितेबद्दल आदर दाखवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.पत्रकार आणि राजकारणी यांच्यातील संबंध गरजापुरते न ठेवता परस्पर सन्मान व सामाजिक जबाबदारीवर आधारित असावेत, असे दीपक वाल्हे सर यांच्या कार्यातून ठळकपणे समोर येतो.

19
2439 views