logo

सार्वजनिक हितासाठी कायदेशीर मागणी) विषय : दौंड तालुका उपजिल्हा रुग्णालयातील दीर्घकाळ रिक्त असलेली पदे तातडीने भरण्याबाबत कायदेशीर मागणी

(सार्वजनिक हितासाठी कायदेशीर मागणी)
विषय : दौंड तालुका उपजिल्हा रुग्णालयातील दीर्घकाळ रिक्त असलेली पदे तातडीने भरण्याबाबत कायदेशीर मागणी

दौंड तालुका उपजिल्हा रुग्णालयात मागील अनेक वर्षांपासून विविध अत्यावश्यक पदे रिक्त असल्याने रुग्णालयाच्या आरोग्यसेवांवर गंभीर परिणाम होत आहे. परिणामी, सामान्य नागरिकांना वेळेवर व दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.

मी खाली सही करणारा दौंड तालुक्यातील जागरूक नागरिक व सामाजिक कार्यकर्ता या नात्याने शासन व आरोग्य प्रशासनाचे लक्ष या अत्यंत गंभीर व जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे वेधत आहे.

सध्या उपजिल्हा रुग्णालयात रिक्त असलेली पदे पुढीलप्रमाणे :

१.वरिष्ठ लिपिक – 01
२.सहाय्यक अधिसेवक – 02
३.अधिपरिचारिका – 02
४.परिसेविका – 01
५.सफाईगार – 03
६.डॉक्टर – 01 (स्त्रीरोग तज्ञ)
७.डॉक्टर – 01 (बालरोग तज्ञ)
८.सोनोग्राफी सेविका – 01

दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गोरगरीब शेतकरी, वीटभट्टी कामगार, रोजंदारीवर काम करणारे नागरिक तसेच झोपडपट्टी भागातील रहिवासी वास्तव्यास आहेत. या सर्वांसाठी दौंड उपजिल्हा रुग्णालय हे एकमेव व अत्यंत महत्त्वाचे शासकीय उपचार केंद्र आहे.

मात्र, आवश्यक मनुष्यबळाअभावी महिलांचे प्रसूती उपचार, बालरोग सेवा, सोनोग्राफी तपासणी तसेच दैनंदिन वैद्यकीय उपचार अत्यंत अपुरे व अडथळाग्रस्त ठरत आहेत. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण करणारी आहे.

ही बाब भारतीय संविधानाच्या कलम 21 अंतर्गत नागरिकांच्या “आरोग्याचा मूलभूत हक्क” याचे स्पष्ट उल्लंघन करणारी आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य धोरणे व उद्दिष्टांच्या पूर्णपणे विरोधात आहे.

मागणी :वरील सर्व रिक्त पदे तातडीने मंजूर करून तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी स्वरूपात त्वरित भरावीत, जेणेकरून दौंड तालुक्यातील सामान्य नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित व वेळेवर वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल.

इशारा : या मागणीबाबत तात्काळ व सकारात्मक कार्यवाही न झाल्यास, आम्हाला लोकप्रतिनिधी, वरिष्ठ शासन स्तर, आरोग्य संचालनालय तसेच आवश्यक असल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल, याची संबंधित प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी.

सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नावर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, ही अपेक्षा.

आपला विश्वासू,
अमर मधुकर जोगदंड
जागरूक नागरिक सामाजिक कार्यकर्ता
पत्ता : भीम नगर, सिद्धटेक रोड, दौंड, जिल्हा पुणे
मोबाईल : 8888058805
ई-मेल : jogdand.amar1@gmail.com
दिनांक : 05/01/2026

98
3777 views