logo

जन्मदात्या आई-वडिलांसह स्व:ताचा सख्या भावानेच केला भावाचा खुण








विसापूर :- बल्लारपूर ८ जानेवारी : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावात ७ जानेवारी दारुड्या मुलाची आई-वडील व भावाने मिळून हत्या केली, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह रेल्वे रुळावर टाकण्यात आला, पोलिसांच्या तपासात धक्कादायक बाबी पुढे आल्या, या प्रकरणी आई-वडील व भावाला बल्लारपूर पोलिसांनी अटक केली. (दारू पिऊन शिवीगाळी, तरुणांनी दगडाने ठेचले)

२५ वर्षीय गणेश विश्वनाथ भोयर असे मृतक युवकाचे नाव आहे, बल्लारपूर पोलिसांनी ७० वर्षीय वडील विश्वनाथ भोयर, ५५ वर्षीय कौशल्य विश्वनाथ भोयर व भाऊ २८ वर्षीय गुरुदास भोयर यांना अटक केली. इंदिरानगर वार्ड क्रमांक ५ मध्ये विश्वनाथ भोयर आपल्या कुटुंबासोबत राहतात, विश्वनाथ याना २ पत्नी असून दोन्ही पत्नीना प्रत्येकी २ मुले आहे, पहिल्या पत्नीचे मुले वेगळे राहतात, तर दुसऱ्या पत्नीचे मुले सोबत राहत होते.

मृतक गणेश हा बेरोजगार होता त्याला दारूचे व्यसन जडले, दारू पिल्यानंतर कुटुंबात कलह निर्माण व्हायचा, ७ जानेवारीला गणेश घरी दारू पिऊन आला, त्यामुळे घरी कडाक्याचे भांडण झाले, आई-वडिलांनी गणेश ला समजविण्याचा प्रयत्न केला मात्र वाद विकोपाला गेला, त्यामुळे गुरुदास ने गणेश च्या डोक्यावर लोखंडी वासल्याने वार केला, अचानक झालेल्या या हल्ल्यात गणेश जमिनीवर कोसळला. तो मृत पावल्याची खात्री पटताच आई-वडील व भावाने कसलाही आरडाओरडा न करता शांत राहिले.

भोयर यांच्या घरी नेहमी भांडणे होत असतात म्हणून शेजाऱ्यांनी लक्ष दिले नाही, रात्री घरातील रक्ताचे डाग आई-वडील व भावाने पूर्णतः स्वच्छ केले, सदर हत्या अपघात वाटावी यासाठी मध्यरात्री गणेश चा मृतदेह गोंदिया-बल्लारशा या रेल्वे रुळावर टाकण्यात आला. सदर मृतदेहाची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांना आधी रेल्वे अपघात वाटला, मात्र घटनास्थळावरील काही बाबी संशयास्पद असल्याने पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली असता हत्येचे बिंग फुटले.

गणेश ची हत्या कुटुंबाने मिळून केल्याचे निष्पन्न झाले, बल्लारपूर पोलिसांनी गणेश च्या हत्या प्रकरणात आई-वडील व भावाला अटक केली. पुरावे नष्ट करण्यासाठी कुटुंबाने गणेश चा मृतदेह ओढत नेला होता. मात्र पोलीस तपासात कुटुंबाचे बिंग फुटले.

गणेश ची हत्या पैश्याच्या वादावरून झाली असा अंदाज आहे, गणेश भोयर याची आई कौशल्या हिचे वडिलोपार्जित घर गोंडपिपरी येथे होते. त्या घराची विक्री झाली होती. त्यातील ७ लक्ष रूपये कौशल्या भोयर यांच्या वाटणीला आले. त्या पैशातून नवीन घर बांधून घ्यावे.असे कुटुंबात ठरले. मात्र याच पैशाच्या कारणावरून दोघा भावंडांत भांडण उकरून निघत होते.दारूच्या व्यसनात पैसे खर्च होईल. याची भीती कुटुंबात होती. हाच वाद विकोपाला गेला आणि हा अमानुष गुन्हा घडला.

याप्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात बि.एन.एस.कलम १03,२3८,3 (५ ) अन्वये गुन्हा दाखल करून गणेश चा मोठा भाऊ गुरूदास, वडील विश्वनाथ व आई कौशल्या भोयर यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास राजुरा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार व बल्लारपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गायकवाड, वैभव चव्हाण, संतोष एनगंदेलवार,विसापूर चौकीचे अजय झाडे, विजय मैंद व पोलीस कर्मचारी करत आहे.

5
6837 views