logo

काल 08 जानेवारी या दिवशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिरडा यांच्या संयुक्त

प्रतिनिधी
यांच्या संयुक्त विद्यमाने बीटस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ.अम्रपाली संघपाल जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. योगेश कुमार मीना सर (IAS- गटविकास अधिकारी पं.स. हिंगोली) उपस्थित होते तर उद्घाटक म्हणून मा.श्री नांदे सर (शालेय पोषण आहार अधीक्षक) तर मार्गदर्शक म्हणून मा. विष्णू भोजे सर (सहाय्यक गट विकास अधिकारी पं.स. हिंगोली) आणि केंद्रप्रमुख आत्माराम जाधव सर यांची उपस्थिती होती ..... या वक्तृत्व स्पर्धेमध्ये हिंगोली बीट अंतर्गत येणाऱ्या विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता.

कलगाव येथील विद्यार्थिनी ईश्वरी वाघमारे हिने प्रथम क्रमांक पटकावला तर एकांबा शाळेतील विद्यार्थिनी अश्विनी वसु हिने द्वितीय आणि फाळेगाव शाळेतील विद्यार्थी विधाता धवसे याने तृतीय क्रमांक पटकावला, तसेच अश्विनी जिरवणकर आणि आदिती आगलावे ह्या सुद्धा उत्तेजनार्थ बक्षीस पात्र ठरल्या

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.... व तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित त्यांच्या भाषणाचे खंड देऊन सन्मान करण्यात आला
त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून मार्गदर्शन केले....... सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे आपल्या विषयाची मांडणी करून प्रेक्षकांना खिळवून ठेवले या कार्यक्रमाला सर्व गावकऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार

0
738 views