logo

आंधळे सरांनी जपली 7 पिढ्यांची परंपरा. नाथ संप्रदायातील महत्वपूर्ण मानली जाणारी कवळिपुजा श्री.जगदंबा देवी संस्थान दे .राजा येथे संपन्न-विशेष प्रतिनिधि

देऊळगाव राजा येथे नवनाथांची कवळी भस्मपूजा विधीवत संपन्न
देऊळगाव राजा ... अशोक कांबळे
शहरातील जगदंबा देवी संस्थान येथे नवनाथ संप्रदायातील अत्यंत दुर्मीळ व वैशिष्ट्यपूर्ण अशी नवनाथांची कवळी भस्मपूजा दिनांक दहा रोजी जगदंबा देवी संस्थान मंदिरात मोठ्या भक्तिभावात संपन्न झाली. महाराष्ट्रात क्वचितच आढळणारा हा विधि फक्त दोन ठिकाणीच होत असतो मात्र गेल्या अनेक वर्षांपासून दे.राजा येथे होणारा हा सोहळा भाविकांसाठी श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरला.
या पवित्र सोहळ्याचे मार्गदर्शन व विधी प्रा. मुकुंदनाथ आंधळे गुरुजी यांनी केले. प्रारंभी विधीवत दिवटी पूजन, नैवेद्य अर्पण व पारंपरिक वाद्य संगीताच्या गजरात पूजाविधी पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले अनेक नाथपंथीय शिष्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. आंधळे गुरुजी यांनी उपस्थितांना स्वतःच्या कुळामधे नवनाथ पंथाचा उगम, त्यांची परंपरा, तसेच महाराष्ट्रातील पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली नाथ पंताची पारंपरिक (दीप प्रज्वलनाची ) विधिबद्दल विधिवत माहिती सविस्तरपणे सांगितली. नाथसंप्रदाय कसा आपल्या घराण्यांमधून जपला गेला आहे, याचेही अभ्यासपूर्ण विवेचन त्यांनी केले.
जगदंबा देवी संस्थानचे संस्थापक अध्यक्ष आंधळे सर यांनी संस्थानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी व धार्मिक कार्याची माहिती दिली.
प्रा. मुकुंदनाथ आंधळे गुरुजी हे सातव्या पिढीतील नाथ संप्रदायाचे अनुयायी असून, देऊळगाव राजा येथे पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या जगदंबा संस्थानात अध्यक्ष म्हणून तसेच नाथपंथीय गोरखनाथ पंथीय गादीचे सांभाळकर्ते म्हणून ते निष्ठेने कार्य करत आहेत.
या धार्मिक सोहळ्यासाठी माहूरगड रेणुका माता मंदिराचे मुख्य गाभारा पुजारी भवानीदास भोपी, अमोल गावंडे (माहुरगड तांबूळ वाला ), ॲड. स्वाती निलेश बारभाई,खंडोबा मंदिर जेजुरीचे वंशपरंपरागत मुख्य गाभारी पुजारी निलेश केशव बारभाई , तसेच बीड येथील क्षीरसागर बांधव विशेष दर्शनासाठी उपस्थित होते.
याशिवाय शहरातील पत्रकार बांधव गणेश डोके, सुषमा राऊत, मो .जमीन पठाण, राहुल नायर, मंगेश तिडके, डोंगरे ,गोंधळी मार्तंड वाघमारे, अशोकभाऊ कांबळे, शुभम, ब्रह्मा, दुर्गेश कामे यांच्यासह अनेक भाविकांनी उपस्थिती लावली.
हा सोहळा नवनाथ परंपरेचे जतन करणारा, श्रद्धा आणि संस्कृती यांचे सुंदर दर्शन घडवणारा ठरला, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली.

15
1796 views