logo

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

मुंबई :
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून 21 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. 22 जानेवारी रोजी अर्जांची छाननी होईल, तर 27 जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत.
5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केले जाणार आहेत.

2
489 views