logo

पुणे महानगरपालिका निवडणूक : प्रचाराच्या तोफा थंडावल्या

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गेले पंधरा दिवस सुरू असलेला प्रचार आज सायंकाळी ५.३० वाजता अधिकृतरीत्या थांबला. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रचाराची मुदत संपल्याने शहरातील राजकीय हालचाली थंडावल्या आहेत.
या कालावधीत विविध पक्ष व उमेदवारांकडून सभा, रॅली व प्रचारफेऱ्या घेण्यात आल्या. प्रचार थांबल्यानंतर आदर्श आचारसंहिता अधिक कडकपणे लागू करण्यात आली असून, गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आता पुणेकर मतदारांच्या निर्णयाकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

9
430 views