
दुर्गाबाई डोह येथे भक्तिभावाची गर्दी उसळणार
विदर्भातून भाविकांची गर्दी; प्रशासनाकडून चोख व्यवस्था
दुर्गाबाई डोह येथे भक्तिभावाची गर्दी उसळणार
विदर्भातून भाविकांची गर्दी; प्रशासनाकडून चोख व्यवस्था
साकोली (जि. भंडारा) तालुक्यातील कुंभली येथे वसलेल्या दुर्गाबाई डोह यात्रेला मकर संक्रांतीच्या शुभ पर्वावर दिनांक 14/01/2026 पासून प्रारंभ होत असून या यात्रेसाठी विदर्भातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार आहेत. निसर्गरम्य परिसरात असलेले दुर्गाबाई देवीचे हे प्राचीन श्रद्धास्थान भाविकांच्या आस्थेचे केंद्र मानले जाते.
दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने भरवली जाणारी ही यात्रा यंदाही उत्साहात साजरी होणार असून देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. यात्रेदरम्यान पूजा-अर्चा, अभिषेक, आरती तसेच धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहेत.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन, ग्रामपंचायत व मंदिर समितीच्या वतीने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भाविकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, प्रकाशयोजना, आरोग्य सुविधा तसेच वाहतूक व पार्किंगची योग्य सोय करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यात्रेतील विशेष आकर्षणे
यात्रेदरम्यान भजन, कीर्तन, जागरण-गोंधळ यांसारखे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी मंदिर परिसरात करण्यात आलेली आकर्षक रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
यात्रेत विविध दुकाने थाटण्यात आली असून पूजेचे साहित्य, घरगुती वस्तू, खेळणी, फुगे, झुले, कपड्यांची दुकाने तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल हे भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहेत. महिलांसाठी साडी-चोळी व सौंदर्यप्रसाधनांची दुकाने तर लहान मुलांसाठी मनोरंजनाची साधने उपलब्ध आहेत.
या यात्रेमुळे परिसरातील लघु व्यावसायिकांना रोजगाराची संधी मिळत असून धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक सलोखा व सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम येथे पाहायला मिळत आहे.