जुन्या रूढी परंपरेवर भाष्य करणाऱ्या नवीन चित्रपटाची घोषणा
चित्रपट क्षेत्रात आपला ठसा उमटवत आपल वेगळं पण सिद्ध करण्याचं काम चित्रपट दिग्दर्शक लेखक रविराज वाव्होळे यांनी केलं आहे. आज झालेल्या चर्चा सत्रामध्ये चित्रपट निर्माते उद्योजक राजेश देसाई व दिग्दर्शक रविराज वाव्होळे यांनी प्रेक्षकांना नवीन वर्षात नव्या दमाचा नवीन विषयावर आधारित जुन्या रूढी परंपरेला वाचा फोडणारा असा नवाकोरा सिनेमा सर्वांच्या भेटीला आणणार आहे अशी घोषणा केली आहे. ह्या चित्रपटा करता दीड ते 2 वर्षाचा कालावधी जाणार असल्याचे चित्रपट दिग्दर्शकाने सांगितले आहे. चित्रपटात असलेले दृश्य, आणि त्या मधे असलेले कलाकार खूप महत्त्वाची बाजू असल्याने त्या वर व्यक्तिगत लक्ष घालून त्याची सांगड घातली जाईल असे ही सांगण्यात आले आहे. सध्या चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात ठेवण्याचं आव्हान निर्मात्यांनी केलं असून ह्या चित्रपटाचा मुहूर्त लवकरच होणार आहे.