logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

तालुका कृषी अधिकारी यांची उत्तम कामगिरी... श्रमदानातून बांधला वनराई बंधारा जनावरांसाठी केली पाण्याची सोय....

*एटापल्ली* : एटापल्ली तालुका कृषि अधिकारी श्री. अरुण बाबुराव वसवाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्ली तालुक्यातील मौजा वेलमागड येथे दिनांक 12/01/2026 रोजी श्रमधानातून वनराई बंधारा बांधण्यात आले.
श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आल्यामुळे आता पुढील काही दिवस गुराढोरांची, पशु -पक्षी, पाळीव प्राणी यांची तहान भागवण्यास मदत होणार आहे. जलसंधारणाच्या स्थायी उपचारा सोबतच अत्यंत अल्प खर्च असणारा पर्याय म्हणजे वनराई बंधारे बांधण्याचा आहे. पावसाळा संपण्याच्या वेळी पावसाची तीव्रता व नदी नाल्यातील पाण्याचा प्रवाहाचा वेग कमी होत असल्यामुळे कमी उताराच्या जागी वाळू, माती, आणि सिमेंटच्या रिकाम्या गोण्या भरून वनराई बंधारे बांधणे गरजेचे झाले आहे. असे केल्याने वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाहाचा वेग कमी होत असल्याने जमिनीतील भुजल पातळी वाढते. त्यामुळे आजूबाजुनंच्या विहिरिंच्या ,हातपंम्पांच्या पाणी पातळी वाढ होऊन रब्बी पिकांना मक्का, भाजीपालाना सिंचन क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. तसेच जंगली पशु-पक्षी व पाळीव प्राण्यांना अनेक दिवस तहान भागवली जाईल. कृषि विभागाच्या वतीने आयोजित आलेल्या वनराई बंधारा बांधण्याचा उपक्रमामुळे पाणी जमिनीमध्ये मुरण्यास मदत होणार आहे.श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यासाठी मार्गदर्शक श्री एच. के. राऊत मंडळ कृषि अधिकारी कसनसूर, श्री अंबादास राठोड उपकृषी अधिकारी कसनसूर -1, व वेलमागड येथील श्री जी. एस. हिचामी सहाय्यक कृषि अधिकारी,श्री देवाजी नैताम पोलीस पाटील, श्री राजु नैताम ग्रामसभा सचिव, श्री दिनेश नैताम गाव भूमिया, श्री गणेश लालसु कुमरे रा. दोलंदा प्रगतशील शेतकरी तथा ग्रामसभा सचिव दोलंदा, श्री बुकलू नैताम, इंग्नेश कुजूर, सुर्गीया एक्का, जोसाय एक्का, अजित कुल्लू, कमलेश पवार, रामभाऊ समरथ, फुलसिंग मडावी तसेच शेतकरी व गावकरी उपस्थित होते.

160
4303 views

Comment