logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

निपाणी वडगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध अभियानांतर्गत महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

**निपाणी वडगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध अभियानांतर्गत महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न**

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव ग्रामपंचायतीच्या संयोगाने मुख्यमंत्री समृद्ध अभियानांतर्गत महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम निपाणी वडगावच्या लोकप्रिय सरपंच सौ. सविता देवकर यांच्या सहभाग व सहकार्यातून मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास निपाणी वडगाव येथील विविध प्रभागांमधील महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. यावेळी अनेक मान्यवर महिला, शासकीय अधिकारी, महिला पदाधिकारी तसेच गावातील गृहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमास सरपंच सौ. सविता देवकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. मंगल नवगिरे, सौ. अर्चना मोरे, सौ. काजल दौंड, सौ. कल्पना फर्नांडिस, सौ. ज्योती जाधव, सौ. चंद्रकला गायधने, सौ. सोनाली राऊत आदी मान्यवर उपस्थित होत्या. महिलांनी पारंपरिक पद्धतीने हळदीकुंकू साजरे करत कार्यक्रमाचा आनंद घेतला.

तसेच अशोकनगर येथील अंगणवाडीमध्ये देखील हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सौ. काळे मॅडम व सौ. बेबी पिंगळे यांच्या उपस्थितीत महिलांनी सहभाग घेतला.

सदर उपक्रमामुळे महिलांमध्ये सामाजिक एकोपा वाढीस लागला असून मुख्यमंत्री समृद्ध अभियानाचा उद्देश प्रभावीपणे साध्य होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

12
375 views

Comment