logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भीमशक्ती रिपब्लिकन सेना कल्याण विधानसभा अध्यक्ष बिनोद दुबे

भीमशक्ती रिपब्लिकन सेना महायुती घटक पक्षांचे मध्यवर्ति कार्यालयाचे भव्य उद्घाटन ॲन्टाॅपहिल वडाळा मुंबई येथे दिनांक - २६ नोव्हेंबर २०२५ रोजी "संविधान दिनानिमित्त संविधान सन्मानदिन सोहळा"मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
‌मध्यवर्ति कार्यालयाचे भव्य उद्घाटन भीमशक्ती रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष, भीमशक्ती शिवशक्ती प्रणेते-मा.अनिल दगडू कांबळे.यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुणे भारतीय जनता पार्टी चे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष मा.संजयजी दास्ताने,मा.माने
मा.अगनी दुरई तसेच भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी मा.चंद्रकांत जिवाटकर (प्रदेश उपाध्यक्ष),मा.रविद्र पवार (प्रदेश सचिव), सौ.उर्मिला अनिल कांबळे (महिला आघाडी प्रदेश प्रमुख), श्रीमती - मंगला पवार (महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा),
सौ. ज्योती व्हटकर (महिला आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्षा),
मा.मुरगेश्वर(मुंबई प्रदेश उपाध्यक्ष),मा.रविंद्र कांबळे,मा.गवळी मा.वसंत घाला (समाज सेवक),मा.महिंद्र राज (धारावी विधानसभा अध्यक्ष),मा.बिनोद दुबे,सौ.बिनदेवी बलराम,सौ.प्रिया देवेंद्र,सौ.राजेश्री रायपूर,मा.सागर सावंत,मा.आर.टी.कांबळे तसेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहून संविधान सन्मानदिन सोहळा फटाक्यांच्या जल्लोषात साजरा करून लोकशाहीचे जागरण करण्यात आले तसेच राष्ट्रीय अध्यक्ष -मा.अनिल दगडू कांबळे आपल्या भाषणात म्हणाले "जब तक सुरज चांद रहेगा तब तक बाबा साहब का संविधान भारत में रहेंगा"
सदर सोहळ्यास मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती होती.

17
714 views

Comment