logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन: बारामतीत शासकीय इतमामात उद्या ११ वाजेला अंत्यसंस्कार

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी खाजगी विमानाने मुंबईहून बारामतीकडे जात होते. लँडिंगच्या वेळी तांत्रिक अडचणींमुळे विमान कोसळले आणि या दुर्घटनेत पाचही जणांचा मृत्यू झाला.

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकीय क्षेत्रात मोठी शोककळा पसरली असून, तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

अजित पवारांवर उद्या, गुरुवारी सकाळी 11 वाजता बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिव आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्यातील अनेक प्रमुख राजकीय नेते आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


Atish khandare
AIMA MEDIA

59
6911 views

Comment