निळी टोपी नाटकाचा आज नांदेड येथे प्रयोग
नांदेड - 31जानेवारी , आंबेडकरवादी मंच निर्मित राहुल जोंधळे दिग्दर्शीत निळी टोपी नाटकाचा प्रयोग शंकरराव चव्हाण प्रेक्षगृहात दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 8 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या नाटकाला आंबेडकरी जनतेते प्रचंड प्रतिसाद द्यावा असेल आवाहन करण्यात आले आहे. निळी टोपी ह्या नाटकातून दलितांचा हजारो वर्षाचा गुलामीचा प्रवास आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ समाजाला मिळालेली नवी संजीवनी याची अप्रतिम जिवंत कथा निळी टोपी नाटकात आपल्याला पहायला मिळेल
हे नाटक आपणभोगलेल्या यातना आणि अस्तित्वाच्या लढाईचा महासग्राम आहे.
यामध्ये दर्जेदार दिग्दर्शन, अभिनय आणि तांत्रिक घटकांचा एकत्रिक कलत्मक परिणाम पहायला मिळणार आहे.
आंबेडकरवादी रंगभूमी अर्थातच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी बांधिलकी जगणारी उपेक्षित - शोषितांच्या बहुजनांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी, सामान्य जणांना आत्मभान देणारी रंगभूमी आहे. देशातल्या प्रस्तापीत रंगभूमी पेक्षा निराळी असून बहुजन नायक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची वाहक असून रंजनापेक्षा समाजाला जागृत करण्यासाठीचा आठ्ठहास धरणारी रंगभूमी जी "दलित रंगभूमी" म्हणून सर्वपरिचित आहे. म्हणून ही रंगभूमी पारंपरिक गुलामीला झुगारून नव्या जीवनाची नवी वाट स्वीकारणारी आहे.यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पण ला सर्व दलितांना बौद्ध धम्मच्या निळ्या शीतल आकाशात मुक्तपणे जीवन जगण्याची ऊर्जा डॉ बाबासाहेब आंबेडकर दिली. म्हणून समस्त दलित समाजावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनंत उपकार आहेत याची जाण असणे अत्यंत गरजेचे आहे हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न आंबेडकरवादी कलावंतांचा राहिलेला आहे. आणि ही विचार सांगणारी कलावंतांची वैचारिक वारसा जपणारी प्रगल्भ चळवळ आहे. ही संघर्षात्मक चळवळ, अविरतपणे चालणारी, कधीही न संपणारी बाब आहे. हजारो वर्षाची गुलामगिरी एका महापुरुषाने अलौकिक बौद्धिक आणि मूलभूत चिंतानातून दलितांचा उद्धार केला आहे. अमेरिकेने डॉ बाबासाहेब आंबेडकरांना नॉलेज ऑफ सिम्बॉल ही जागतिक स्तरावरील सर्वश्रेष्ठ उपाधी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला हे ही आपल्यासाठी अभिमानाची मौल्यवान बाब आहे.
प्रा. कैलास पुपुलवाड