सुनेत्रा अजित पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान
(पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)
दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज, शनिवारी (ता. ३१) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधिमंडळनेते पदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघात बुधवारी (ता. २८) विमान अपघातात निधन झाले. अजितदादांचा अत्यंविधी पार पडल्यानंतर लगेचच रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदासाठी राजकीय घडामोडी घडू लागल्या. उपमुख्यमंत्री व विधिमंडळ नेता निवडीबाबत पवार कुटुंब व राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी राज्यसरकार व भारतीय जनता पक्ष ठामपणे उभे राहिल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पवार कुटुंब व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात चर्चा झाल्या. आधी सुनेत्रा पवार उपमुख्यंत्रीपद स्विकारायला तयार नव्हत्या. मात्र, अजितदादांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी व पक्षहितासाठी त्या उपमुख्यमंत्रीपद स्विकारण्यास तयार झाल्या. सुनेत्रा पवार २०२४ पासून राज्यसभेच्या खासदार आहेत. त्यांनी खासदार पदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक झाली. त्यात सुनेत्रा पवार यांची निवड विधिमंडळ गटनेतेपदी करण्यात आली.
सायंकाळी ५ वाजता लोकभवनामध्ये सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला. महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या त्या पहिल्या महिला आहे. यावेळी, उपस्थित नेत्यांनी ‘अजित पवार अमर रहे’ असा जयघोष केला.