logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

वृद्ध महिलेच्या खुनाचा केवळ 48 तासात उलघडा

प्रतिनिधी
विनोद भगत
अलिबाग :- ( जि. प्र.) चौल येथील टेकाळकर येथील राहणाऱ्या ७०वर्षीय वृद्ध महिलेचा खून व जबरी चोरी प्रकरणाचा रायगड पोलिसांनी केवळ ४८ तासात उलगडा केला असून, मयत महिलेचा जावई असलेल्या मुख्य आरोपीसह चौघन ताब्यात घेण्यात आले आहे. अवघ्या ४८ तासात गंभीर गुन्ह्याचा उलगडा करण्यात रायगड पोलिसांना यश आले पोलीस दलाचे सर्वत्र सर्वत्र कौतुक होत आहे. मंदा प्रमोद म्हात्रे (वय ७०) या वृद्ध महिला चल येथे एकट्याच राहत होत्या. २८ जानेवारी रोजी सकाळी ९- 30 वाजण्यापूर्वी एका अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांचा खून केला आणि अंगावरील सोन्याचे दागिने लंपास केले.

50
550 views

Comment