कु. आदिनाथ वावरे यांच्या लढ्याला यश.
कासा गावात भरणाऱ्या ख्रिश्चन मिशनरी …..बंद!!!
दि. ०३/०२/२०२६. पालघर .
गेल्या अनेक वर्षापासून डहाणू तालुक्यातील कासा गावात काही ठिकाणी आदिवासी लोकांमध्ये ख्रिश्चन मिशनरी अंतर्गत ख्रिस्ती धर्माच्या प्रसार, प्रचार तसेच बैठक चालू होत्या. गावातील एक तरुण कु. आदिनाथ वावरे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना उप तालुका प्रमुख) यानी पुढाकार घेवून आदिवाशी लोकांमध्ये होणाऱ्या या ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराबदल आवाज उठविला. त्याचे म्हणणे असे आहे की , या ज्या सभा किव्हा बैठका गावकऱ्यांच्या कोणत्याही परवानगी शिवाय होत आहेत, त्यामुळे या सभा बेकायदेशीर आहेत.
या सभेमध्ये गावातील व इतर गावातील गोर गरीब व अशिक्षित आदिवासीं लोकांना आजारावर उपचार तसेच अमिष दाखवून , गैरसमज पसरवुन ख्रिश्चन धर्माचा प्रसार चालू होता. त्यामुळे कुठेतरी आदिवासीं संस्कृती व रूढीपरंपरा वर परिणाम याचा होत आहे. गावातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
ख्रिच्छन सभा बंद करण्यासाठी ग्रामपंचायत कासा येथील ऑगस्ट २०२५ च्या ग्रामसभेत ठराव सर्वानुमते मंजूर केला होता . ठराव झाल्यानंतर ही सभा मात्र चालू होत्या. अखेर कु. आदिनाथ वावरे याने स्वतः पुढाकार घेऊन अर्जावर अनेक लोकांची स्वाक्षरी मोहीम घेऊन तो अर्ज पोलिस ठाणे कासा येथे दि.२१/०१/२०२६ सादर केला. शेवटी पोलिस प्रशासनाने गावातील कायदा सु-व्यवस्था बिघडू नये म्हणून ख्रीचन बैठकिला टाळा लावून बंद केली.