logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न*

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय शहापूर इचलकरंजी यांचे वतीने रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत रोटरी क्लब येथे इचलकरंजी शहरातील प्राथमिक व माध्यमिक हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या करिता प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.*
*याप्रसंगी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय श्री विजय इंगवले,सहाय्यक परिवहन अधिकारी माननीय श्रीमती अंकिता वांडेकर मॅडम,मोटार वाहन निरीक्षक गणेश माशाळकर,दत्तात्रय शिर्के व रोटरी क्लबचे अध्यक्ष माननीय संजयजी घायतीडक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले असता विद्यार्थ्यांनी या सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली.*
*सदर स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून आर एस कुलकर्णी मॅडम व रिटा रोड्रिक्स मॅडम यांनी काम पाहिले.याप्रसंगी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले साहेब व सहाय्यक परिवहन अधिकारी श्रीमती अंकिता वांडेकर मॅडम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा घेण्यामागचा हेतू विशद करून रस्ता सुरक्षा नियमा संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.*
*यावेळी स्वागत व प्रास्ताविक गजानन शिरगांवे यांनी केले. सूत्रसंचालन रिटा रॉड्रिक्स मॅडम यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार आर एस कुलकर्णी मॅडम यांनी मानले.अनेक प्रशालेचे शिक्षक, शिक्षिका तसेच विध्यार्थी व विध्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

16
496 views

Comment