logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

महायुतीच्या उमेदवारासच प्रचंड बहुमताने विजयी करा :- आमदार राणाजगजितसिंह पाटील

प्रतिनिधी :- विकास वाघ धाराशिव. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नायगाव जिल्हा परिषद गटातील महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. उद्धव बाजीराव शितोळे पाटील आणि रांजणी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ. मनीषा लक्ष्मण देशमुख यांच्या प्रचारार्थ रांजणी, ता. कळंब येथे या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची प्रचार सभा नुकतीच उत्साहात व जोशात पार पडली.

या सभेत विकास, विश्वास आणि एकजुटीचा संदेश देत, रांजणीसह संपूर्ण नायगाव गटाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीत सक्षम, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख उमेदवारांना संधी देण्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व अजितदादा पिंगळे यांनी यावेळी सर्व मतदारांना आवाहन केले.

सभेला लाभलेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, भरभरून मिळालेले प्रेम आणि विश्वास हीच परिवर्तनाची खरी ताकद असून, यावेळी मतदारांनी विकासाच्या म्हणजेच महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

28
2814 views

Comment