logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा, कोल्हापूर


रात्रौ घरफोडी करणारा आरोपी जेरबंद करवीर पोलीस ठाणेचे एकूण 14 घरफोडीचे गुन्हे उघड. 230.190 ग्रॅम सोने, 3 किलो चांदी व इतर साहित्य असा एकूण 44,68,050/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कामगिरी
कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, श्री योगेश कुमार साो यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडत असलेले घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीने विशेष मोहिम राबविणे बाबत सुचना दिल्या होत्या.
मा.पोलीस अधीक्षक सो, कोल्हापूर यांनी दिले सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, सुशांत चव्हाण यांनी शाखेकडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांची पथके तयार करुन कोल्हापूर जिल्हयामध्ये मालाविरुध्दचे गुन्हयासह रात्रौचे वेळी घडलेले घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचे दृष्टीने तपास पथकातील पोलीस अधिकारी व अमंलदार यांना गुन्ह्यांचे ठिकाणी भेटी देवून गुन्हा घडले ठिकाणची भौगोलीक परिस्थीती, गुन्हा करणेची पध्दत याची माहिती घेण्याच्या सुचना दिल्या. तपास पथके हे माहिती घेत असताना अज्ञात चोरटयाने कोल्हापूर शहराचे लगत असणारे उपनगरातील बंद स्थितीत असणारी घरे लक्ष्य करुन सदरच्या घरामध्ये चो-या केलेचे निदर्शनास आले. निष्पन्न झालेले माहितीचे आधारे तपास पथकाने कोल्हापूर शहरालगत असणारे उपनगरात रात्रौचे वेळी घडलेले घरफोडी चोरीचे गुन्ह्यांचा एकत्रितरित्या तपास सुरु केला.
तपासामध्ये गुन्हा घडलेली ठिकाणे, गुन्हा करणेचे पध्दतीसह इतर तांत्रीकदृष्टया तपास करीत असताना करवीर पोलीस ठाणे, गु.र.नं. 693/2025, बी. एन. एस. 331 (3), 331(4), 305(अ) प्रमाणे दाखल गुन्हा हा प्रताप कदम, रा. पाचगांव, ता. करवीर, जि. कोल्हापूर याने केला असलेचे निष्पन्न झाले. सदर इसम हा नमुद गुन्ह्यातील चोरलेले दागीने विक्री करणेकरीता उजळाईवाडी, ता. करवीर गांवचे हद्दीत भारती विद्यापीठ कडून पुणे- बेंगलोर हायवेकडे येणारे रोडजवळ येणार असलेबाबत पथकातील पोलीस अमंलदार दिपक घोरपडे व प्रविण पाटील यांना गोपनीय बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली. मिळाले माहितीचे आधारे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अमंलदार प्रविण पाटील, दिपक घोरपडे, संजय पडवळ, अरविंद पाटील, सतिश सुर्यवंशी अशा पथकाने दि. 27.01.2026 रोजी उजळाईवाडी गांवचे हद्दीत भारती विद्यापीठ कडून हायवे रोडवर येणारे कॉर्नरजवळ सापळा लावून आरोपी नामे प्रताप सुरेश कदम, व. व. 31, रा. शिवाजी चौक कासारवाडी, शिरोली एम. आय. डी. सी. ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर सध्या रा. नक्षत्र पार्क शिक्षक कॉलनी पाचगांव, ता. करवीर, जि. कोल्हापूर यास त्याचे कब्जातील 3,00,000/- रुपये किंमतीचे 20 ग्रॅमचे सोन्याचे दागीन्यासह पकडले.
मा. वरिष्ठांचे आदेशान्वये करवीर पोलीस ठाणे, गु.र.नं. 693/2025, बी. एन. एस. 331 (3), 331 (4), 305 (अ) प्रमाणे दाखल गुन्हा तपासाकरीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे घेवून आरोपी प्रताप सुरेश कदम यास नमुद गुन्ह्यात अटक करुन त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेवून तपास केला. तपासात त्याने गेले दोन वर्षापासून कोल्हापूर शहरालगत असले उपनगरात रात्रौचे वेळी घरफोडी-चोरीचे गुन्हे केलेचे निष्पन्न झाले. नमुद आरोपी हा
शिरोली एम.आय.डी.सी. येथील राहणारा आहे परंतू तो गेले तीन वर्षापासून पाचगांव, ता. करवीर परिसरात भाडयाने राहत आहे. आरोपी हा कोणताही कामधंदा करीत नाही परंतू शहरालगत असले उपनगरात राहणेस असलेने त्याने राहत असले परीसरात आसपासचे परीसरात रात्रौचे वेळी पायी चालत जावून बंद असलेली घरे लक्ष्य करुन घरफोडी चो-या केलेचे निष्पन्न झाले आहे. आरोपी प्रताप सुरेश कदम याचेकडून आज पावेतो केले तपासामध्ये 230.190 ग्रॅम सोन्याचे व 3 किलो चांदीचे दागिने व इतर मुद्देमाल असा एकूण 44.68,050/- रुपये किंमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त केला आहे.
आरोपी प्रताप सुरेश कदम याचेकडून उघडकीस आलेले गुन्ह्यांची माहिती खालील प्रमाणे.
अ.नं.
पोलीस ठाणे
गु.र.नं.
बी. एन. एस.
01
करवीर
591/2023
331(3),331(4),305(37)
02
करवीर
203/2025
331(3),331(4),305(37)
03
करवीर
216/2025
331(3),331(4),305(37)
04
करवीर
253/2025
331(3),331(4),305(37)
05
करवीर
260/2025
331(3),331(4),305(37)
06
करवीर
314/2025
331(3), 331(4),305(37)
07
करवीर
370/2025
331(3),331(4),305(37)
08
करवीर
439/2025
331(3),331(4),305(37)
09
करवीर
472/2025
331(3), 331(4),305(37)
10
करवीर
536/2025
331(3),331(4),305(37)
11
करवीर
582/2025
331(3), 331(4),305(37)
12
करवीर
599/2025
331(3),331(4),305(37)
13
करवीर
693/2025
331(3),331(4),305(37)
14
करवीर
678/2025
331(3),331(4), 305(37)
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक, श्री. योगेश कुमार सो, व मा. अपर पोलीस अधीक्षक, डॉ. बी. धिरजकुमार साो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुजितकुमार क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक श्री. सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक श्री. शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार प्रविण पाटील, दिपक घोरपडे, संजय पडवळ, अरविंद पाटील, सतिश सुर्यवंशी यांनी केली आहे.

11
123 views

Comment