logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*कनियाडोल येथे लोकसंस्कृतीचा भव्य समागम लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत राष्ट्रीय जंगी खडा दुय्यम तमाशा उत्साहात संपन्न*

नागपूर जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात येणाऱ्या कनियाडोल येथे आदर्श सांस्कृतिक विकास मंडळ कनियाडोल आणि कोकर्डा यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय जंगी खडा दुय्यम तमाशाचा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या या भव्य आयोजनाने लोकसंस्कृती आणि पारंपरिक कलेला जिवंत ठेवण्याचे कार्य केले आहे. या कार्यक्रमाला परिसरातील हजारो रसिक प्रेक्षकांनी मोठी उपस्थिती दर्शवून दिवसभर शाहिरी कलेचा आनंद लुटला.
या सांस्कृतिक सोहळ्याचे अध्यक्षपद कळमेश्वर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबारावजी कोढे यांनी भूषविले. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य महेंद्रजी डोंगरे, माजी सभापती श्रावणदादा बिंजारे, नरेंद्रजी पालटकर, किशोरभाऊ बंजारी, अनिलभाऊ बंड, सरपंच धर्माजी आसोले, सरपंच अमोलभाऊ फुलारे, शाहगीरभाऊ महाजन, बबलू महाजन, बाोराव जुंघरे, बाबाराव बोरकर, प्रभाकरजी राउत, बुद्धभाऊ मालाधारी आणि वामनरावजी गावंडे उपस्थित होते. यासोबतच कनियाडोलच्या पोलीस पाटील मृदुला प्रीतिपाल ठवरे, कोकर्डाचे पोलीस पाटील योगेशजी पाटील, दिलीप वरखेडे, दंतपाल वाघ, प्रफुल्ल रामदास टाले, रोशन कवर्डुजी वाघ, श्रावण धोटे, विष्णू बंड आणि अमोल पाटील यांनी उपस्थित राहून कलाकारांचे मनोबल वाढवले.
शाहिरी कलेचा खरा थरार सुर संगम तुरा प्रकाश मंडळ कनियाडोलचे शाहीर भाऊ सुनील व त्यांचे सहकारी आणि राष्ट्रीय आझाद कलापथक चिमूर नवेगावच्या सुप्रसिद्ध शाहिरा जयाबाई बोरकर यांच्यात रंगलेल्या कलगी तुरा मुकाबल्यात पाहायला मिळाला. सकाळी ९ वाजता सुरू झालेला हा सांस्कृतिक महाकुंभ रात्री १० वाजेपर्यंत अखंड सुरू होता. कलाकारांनी आपल्या बुलंद आवाजात आणि डफाच्या तालावर सामाजिक तसेच धार्मिक विषयांचे सादरीकरण करून उपस्थित जनसमुदायाला मंत्रमुग्ध केले. या गौरवशाली आयोजनाच्या यशस्वीतेसाठी सरपंच लालमोहम्मद मालाधारी, उपसरपंच संगीता बोरकर, दादारावजी जुंघरे, अशोक बोरकर, संदीप डोंगरे, नारायणजी टाले, मालतीताई लोणारे, कलावतीताई गावंडे आणि एमाबाई मेश्राम यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन आदर्श सांस्कृतिक विकास मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण टाले, सचिव श्रीरामजी मरसकोलहे, उपाध्यक्ष मोहनजी वासनिक, सहसचिव शंकरजी मडके, कोषाध्यक्ष नंदू राउत आणि सहकोषाध्यक्ष राजेंद्र कुदथे यांनी केले. या सोहळ्याचे मुख्य आयोजक रंजीत उके, चिन्मुजी टाले, रवींद्र बंजारी आणि संघटक निखिल मेश्राम, धनराज बोरकर, बबलू बोरकर होते. तसेच नारायणजी गावंडे, शेषरावजी उताणे, घनश्यामजी लोणारे, पुंडलिक गावंडे, सुनील नरबरिया, पुंडलिक जुनाघरे, काशिनाथ बोरकर, शाहीर शेषरावजी गजभिये, संजय राउत, पुसाराम मेश्राम, भीमरावजी मेश्राम, कुसन मेश्राम, रमेश बंजारी, मनोज वांढरे, देविदास मडके, गौतम मेश्राम आणि प्रकाशभाऊ गावंडे यांच्यासह गावातील सर्व कार्यकर्त्यांनी हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

68
4058 views

Comment