logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

खेळाच्या सांघिक भावनेतून गावाची एकात्मता वाढीस @ वेलगूर येथे व्हॅलीबाल सामन्याच्या उदघाटन प्रसंगी अजय कणकडालवार यांचे मत

खेळाच्या सांघिक भावनेतून गावाची एकात्मता वाढीस
@ वेलगूर येथे व्हॅलीबाल सामन्याच्या उदघाटन प्रसंगी अजय कणकडालवार यांचे मत


सांघिक खेळामध्ये गावाच्या परिसरातील खेळाडूंमध्ये सांघिक भावना निर्माण होऊन गावात एकसंघता, एकात्मता वाढीस लागत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी न्यू स्टार मंडळ वेलगूर तर्फे आयोजित भव्य ग्रामीण वॉलीबॉल सामन्यांच्या उदघाटन प्रसंगी उदघाटक पदावरून व्यक्त केले.
वेलगुर येथील शिवराम बडगेल यांच्या भव्य पटांगणावर दिनांक सहा जानेवारीपासून अंतिम सामन्यापर्यंत व्हॉलीबॉल सामन्यांची शृंखला होणार आहे.
सामान्यांच्या उद्घाटन प्रसंगी काँग्रेस प्रदेश सचिव हनुमंत मळावी, माजी पंचायत समिती उपसभापती गीताताई चालूरकर, प्रतिष्ठित नागरिक आत्माराम गदेकर, आनंद मराठे, रोहित गलबले, सरपंच किशोर आत्राम व उपसरपंच उमेश मोहूरले उपस्थित होते.
उत्कृष्ट खेळाडूंना प्रथम पारितोषिक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव अजय कांकडालवार यांचेकडून,द्वितीय बक्षीस हनुमंत मळावी व गीताताई चालूरकर तर तृतीय बक्षीस आत्माराम गदेकर व आनंद मराठे यांच्याकडून देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला कुसुम दुधी, अरविंद कन्नाके, हरिदास आत्राम, डॉ.गलबले,डॉ. सपन हलदार, नागोराव सोनुले, राजेश्वर उत्तरवार व इतर पाहुणे मंडळींनी यावेळी हजेरी लावली होती.
व्हॉलीबॉल सामान्य दरम्यान प्रत्येक क्षणाचे वैयक्तिक पुरस्कार विविध मान्यवरांकडून देण्यात येणार आहेत.
न्यू स्टार मंडळ वेलगुरूचे अध्यक्ष रघुनाथ राऊत, उपाध्यक्ष शंकर मराठे व अनुपम वसाके, सचिव अनिल राऊत व योगेश गदेकर व इतर सदस्यांनी व्हॅलीबाल सामन्यांची गुणवत्ता व यशस्वीतेकरिता मेहनत घेत आहेत.

50
8059 views

Comment