logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

* अहमदपूर निवडणूक मतमोजणीची जय्यत तयारी; उद्या सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ *

शिवाजी श्रीमंगले ( विशेष प्रतिनिधी ) जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 चे अनुषंगाने मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या, दिनांक ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), अहमदपूर येथे मतमोजणीला सुरुवात होईल.
निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषा लटपटे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उज्वला पांगारकर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली प्रशासन सज्ज झाले आहे.

*मतमोजणी टेबल रचना:*
मतमोजणीसाठी मुख्य हॉलमध्ये १४ टेबल असून, आपत्कालीन स्थितीसाठी ४ टेबल राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच, पोस्टल मतपत्रिकेसाठी स्वतंत्र ३ टेबल आणि २ राखीव टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतमोजणीची प्रक्रिया निर्दोष पार पाडण्यासाठी प्रत्येक टेबलवर सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक टेबलवर खालीलप्रमाणे चार जणांचे पथक कार्यरत असेल:
१. एक क्षेत्रीय अधिकारी (Sector Officer)
२. एक मास्टर ट्रेनर
३. एक सहाय्यक कर्मचारी
४. एक शिपाई
5.
महत्त्वाच्या जबाबदाऱ्या:
स्ट्राँग रूम नियंत्रण: नायब तहसीलदार संतोष अनर्थे व संजय भोसीकर.
टॅब्युलेशन (Tabulation): उपकोषागार अधिकारी जी. एन. गोपवाड.
संगणक कक्ष: नायब तहसीलदार अभिलाष जगताप.
साहित्य पुरवठा: एन. बी. अर्जुने.
भोजन व्यवस्था: पुरवठा निरीक्षक एस. आर. जवादे.
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सर्व प्रक्रियेचे सीसीटीव्ही चित्रीकरणही केले जाणार आहे. निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून प्रशासनाने पारदर्शकतेसाठी सर्व पावले उचलली आहेत. जन जन आवाज सोशल मीडिया, ( महाराष्ट्र )लातूर .

29
1836 views

Comment