logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

खतवड येथे मोफत महाआरोग्य शिबीर संपन्न.

दिंडोरी l प्रतिनिधी:- परनॉड रिकार्ड इंडिया फाउंडेशन, वोक्हार्ट फाउंडेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र अवनखेड आणि ग्रामपंचायत खतवड यांच्या सहकार्याने आयोजित महाआरोग्य तपासणी शिबिर उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले.
या शिबिरात खतवड व गावातील परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकूण ३५७ नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या. या शिबिरात जनरल तपासणी, नेत्र तपासणी, स्त्रीरोग तपासणी, अस्थिरोग तपासणी, दंतरोग तपासणी,रक्त तपासणी अशा विविध सेवा तसेच मोफत औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले. मोफत चष्मे वाटप करण्यात आले.उपस्थित महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले.
या शिबिरामध्ये आरोग्य विषयक जनजागृती सत्र घेण्यात आले. ज्यामुळे आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण झाली.
या प्रसंगी ग्रामपंचायत खतवड येथील सरपंच बबन दोबाडे, उपसरपंच सुखदेव खुर्दळ, ग्रामसेविका आर.एच. कार्यपुरी, ग्रामपंचायत कर्मचारी विनोद जाधव,बापू गवे ,आशा सेविका सोनाली नेहरे, प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव येथील आरोग्य सेवक शिवाजी गायकवाड,सिस्टर सविता जाधव, यांनी शिबिरास भेट देऊन मदत केली.
शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी वोक्हार्ट फाउंडेशन प्राथमिक आरोग्य केंद्र अवनखेडचे प्रकल्प समन्वयक कृष्णा पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिबिरामध्ये आपली सेवा बजावणारे तज्ञ डॉक्टर्स आणि कर्मचारी जनरल तपासणी डॉ. संजय देशमुख,डॉ. ओम कदम, स्त्रीरोग तज्ञ डॉ. परिमल चव्हाण,अस्थिरोग तज्ञ डॉ.राहुल ठाकरे, नेत्ररोग तज्ञ डॉ.सुरेश थोरे, दंतरोग तज्ञ डॉ. कस्तुरी दायमा,फार्मासिस्ट स्नेहा जाधव,लॅब टेक्निशियनकैलास वसावे,ज्योती मोगल,सिस्टर पुष्पा शार्दुल, रिसेप्शन ज्योती नेहरे आदी उपस्थित होते.
या शिबिरामुळे खतवड व परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता वाढली असून, नागरिकांकडून या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.

46
3025 views

Comment