logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी कविता संतोष मुळे तर उपमहापौरपदी दिपकसिंग काशिनाथसिंग रावत यांची निवड

नांदेड,दि.१० फेब्रुवारी :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक दि.१०.०२.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता महापालिकेच्या डॉ.शंकरराव चव्हाण सभागृहात पार पाडण्यात आली. भाजपच्या *कविता संतोष मुळे* यांची महापौरपदी निवड झाली असुन उपमहापौरपदी भाजपचे *दिपकसिंग काशिनाथसिंग रावत* यांची निवड झाली आहे. यावेळी पिठासिन अधिकारी म्हणुन *जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांची उपस्थिती होती. या विशेष सभेला महापालिकेतील सभागृहात सर्व ८१ नगरसेवक दाखल झाले. सभेचा प्रारंभ वंदे मातरम गिताने केल्यानंतर *नगरसचिव तथा उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांनी स.सदस्यांना मतदानाची प्रक्रिया समजावुन सांगितली. त्यानंतर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला. परंतु एकाही उमेदवाराने माघार घेतली नसल्याने पिठासिन अधिकारी यांनी मतदान प्रक्रियेला प्रारंभ केला.

प्रारंभी प्राप्त नामनिर्देशनावरील नावाच्या वर्णानुक्रमाने एम.आय.एम.पक्षाच्या अल्केसरी सुमय्या गुल्फाषण सरहान अलकेसरी, काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या माहेजबीन अब्दुल फहीम व भाजपच्या कविता संतोष मुळे या उमेदवारांना निवडून देण्यासाठी हात उंचावून महापौर पदासाठी निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर भाजपच्या कविता संतोष मुळे यांची महापौरपदी वर्णी लागणी आहे. भारतीय जनता पक्षाच्या कविता संतोष मुळे या महापौरपदी निवडून आल्याचे जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी राहुल कर्डीले यांनी घोषीत केले.

त्याचप्रमाणे उपमहौरपदासाठी सुध्दा प्राप्त नामनिर्देशनावरील नावाच्या वर्णानुक्रमाने एम.आय.एम.पक्षाच्या धोंगडे अश्विनी दशरथ, भाजपचे दिपकसिंग काशिनाथसिंग रावत व काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीचे राहुल मधुकर सोनसळे या उमेदवारांना निवडून देण्यासाठी हात उंचावून उपमहापौर पदासाठी निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर उपमहापौरपदी भाजपचे नगरसेवक दीपकसिंह रावत यांनी बाजी मारली असुन आज झालेल्या विशेष सभेमध्ये भाजपच्या उमेदवारांनी प्रत्येकी ५० मते मिळवून स्पष्ट बहुमत सिद्ध केले. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीला केवळ १५ मतांवर समाधान मानावे लागले, तर एमआयएमला १४ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.

*चौकट*
*निवड प्रक्रियेची आकडेवारी*
एकुण हजर असलेल्या पालिका सदस्यांची संख्या - (८१)
मतदानात भाग घेतलेल्या पालिका सदस्यांची संख्या - (७९)
मतदानात भाग न घेतलेल्या तटस्थ असलेल्या पालिका सदस्यांची संख्या - (०२)
*महापौर पदासाठी उमेदवारांना मिळालेली मते*
कविता संतोष मुळे - (५०)
माहेजबीन अब्दुल फहीम - (१५)
अल्केसरी समय्या गुल्फाषण सरहान अलकेसरी - (१४)
*उपमहापौर पदासाठी उमेदवारांना मिळालेली मते*
दिपकसिंग काशिनाथसिंग रावत - (५०)
राहुल मधुकर सोनसळे - (१५)
धोंगडे अश्विनी दशरथ - (१४)

10
705 views

Comment