आज दिनांक 12 फेब्रुवारीच्या राष्ट्रव्यापी कामगार संपास "महाराष्ट्र शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन (लाल बावटा)" च्या नांदेड जिल्हा समितीचा पाठिंबा
मुखेड.
आज दिनांक 12 फेब्रुवारीच्या राष्ट्रव्यापी कामगार संपास "महाराष्ट्र शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन (लाल बावटा)" च्या नांदेड जिल्हा समितीच्या नेतृत्वाखाली शेतमजूर व इतर ग्रामीण मजुरांनी, शहरातील सफाई कामगारांनी दणदणीत मोर्चा काढून सक्रिय पाठींबा जाहीर दिला आणि आपल्या प्रश्नांचे निवेदन तहसील कार्यालय, नगर पालिका व पंचायत समिती कार्यालयास सादर केले. शेतमजूर व इतर ग्रामीण मजुरांनी आपल्या मागण्यांसंबंधात जोरदार घोषणाबाजी करीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून शिवाजी नगर ते मुख्य बाजारपेठेतुन तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. सदर मोर्चात पुढील मागण्या करण्यात आल्या. -
1. "VB - G RAM G 2025" हा ग्रामीण मजुरविरोधी कायदा रद्द करून मनरेगा कायदा पुन्हा मजबुतीने लागू करा.
2. मागेल त्या मजुराच्या हातास रोजगार हमी योजनेचे काम तात्काळ उपलब्ध करा
घरकुलाची थकीत हप्ते तात्काळ अदा करा, शासनाच्या घोषणे नुसार जिओ टॅगिंग नंतर ८५ टक्क्यांच्या आत पैसे द्या.
3. बांधकाम कामगारांना 90 दिवस काम केल्याचे प्रामाणपत्र उपलब्ध करा व कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधीत कर्मचार्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करा.
4. मागील दोन महिन्यांचे श्रावण बाळ योजना, विधवा, वृद्ध, परित्यक्ता, दिव्यांगाचे निराधार अनुदान तात्काळ वाटप करा.
श्रावणबाळ, वृद्ध निराधार, विधवा, परित्यक्ता लाभार्थ्यांना दरमहा अडीच हजार रुपये प्रमाणे मानधनात वाढ करा.
5. शेतकऱ्यांप्रमाणेच "भूमीहीन शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर सन्मान योजना" सुरू करा.
6. ज्या महिलांचे लाडकी बहिण योजना अनुदान बंद केले आहे ते सुरू करा व कुटुंबातील सर्व महिलांना लाभ द्या.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत, राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनावाप्रमाणे 3 हजार रुपयापर्यंत वाढ करा.
7. रेशनच्या यादीत ग्रामीण मजुरांची व अल्पभूधारक शेतकऱ्यांची नावे "शेतकरी यादीतून" वगळून त्यांना रेशनकार्ड द्या आणि स्वस्तधान्य दुकानातून रेशन द्या.
8. एकल महिलांची विशेष नोंद घेऊन, त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांच्याकरिता विशेष सामाजिक सुरक्षा योजना जाहीर करा.
9. मुखेड नगरपालिका अंतर्गत शहरातील मजुरांसाठी रोजगार हमी योजनेचे काम सुरू करा.
10. फुले नगर, वाल्मिक नगर व बजरंग नगर येथील घरे नगर पालिकेच्या मालकी रजिस्टरमध्ये नोंदवा आणि घरकुल तसेच इतर योजनांचा लाभ द्या.
11. मुख्य बाजारपेठेतील व्यापारी, गाडीवान, फळे व भाजी विक्रेते आणि ग्राहकांसाठी शौचालय व मुतारी उभारा
12. कृषी उत्पन्न बाजारसमिती अंतर्गत
हमाल-मापाडी व इतर कामगारांसाठी शौचालय-मुतारीची व्यवस्था करा आणि विश्रामगृह बांधा.
13. गायरान व इतर कासण्यायोग्य जमिनी भूमिहीन मनुरांच्या नावे करा
14. मुखेड नगर पालिकेतील सफाई कामगारांना कामातून खंड दिला आहे; त्या सर्व सफाई कामगारांना पुन्हा तात्काळ कामावर घेऊन त्यांना सामाजिक सुरक्षा लागू करा.
या मागण्यांचे निवेदन मा. तहसीलदार साहेब यांनी स्वतः मोर्चेकऱ्यांना सामोरे जाऊन स्वीकारले. मोर्चाचे नेतृत्व युनियनचे राज्यसहसचिव कॉ. विनोद गोविंदवार, जिल्हाध्यक्ष कॉ. अंकुश अंबुलगेकर, जिल्हासचिव कॉ. मंजुश्री कबाडे, जिल्हापाध्यक्ष कॉ. माधव देशाटवाड, मुखेड तालुकाध्यक्ष कॉ. माणिक गोणशेटवाड, तालुका सचिव कॉ. शहादत धुंदी यांनी केले. मोर्चा यशस्वी करण्यासाठी कॉ. पंचफुला पोतलवाड, कॉ. लक्ष्मीबाई दुधवाड, कॉ. विलास शिवपूजे, कॉ.अंकुश काळेवार व कॉ. रावसाहेब शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले. डीवायएफआय या युवक संघटनेच्या वतीने कॉ. आकाश देशटवाड व कॉ. सुधाकर कांबळे यांनी पाठिंबा दिला.