येवला मनमाड रोडवर ट्राफिक जाम
नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील नांदगाव शहरापासून जवळच असलेल्या मनमाड येथे येवला मनमाड रोडवर गेल्या अनेक दिवसापासून वाहनांची मोठी गर्दी होत आहे
या गर्दीमुळे शाळेतील विद्यार्थी, नागरिक व इतर लोकांना अत्यंत त्रास होत असून याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याचे गरजेचे आहे. ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलीस फाटा या ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे अशी मागणी नागरिक करत आहे