logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देश व मार्गदर्शनाखाली भरती प्रक्रियेला डिजिटल बळ. पारदर्शक पोलीस भरतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देश व मार्गदर्शनाखाली भरती प्रक्रियेला डिजिटल बळ. पारदर्शक पोलीस भरतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर.

लातूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस भरती प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक, निष्पक्ष व गुणवत्ताधारित पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देश व मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलीस यांच्या धोरणानुसार डिजिटल प्रणालीचा अवलंब करून भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा नवा आदर्श निर्माण करण्यात आला आहे.

🔹बायोमेट्रिक प्रणाली चा वापर
उमेदवारांची अचूक पडताळणी भरती प्रक्रियेच्या प्रारंभी प्रत्येक उमेदवाराची बायोमेट्रिक नोंदणी (फिंगरप्रिंट रेकग्निशन) करण्यात येते. मैदानी चाचणीवेळी नोंदवलेली बायोमेट्रिक माहिती
लेखी परीक्षेदरम्यान पुन्हा पडताळली जाते यामुळे मैदानी चाचणी देणारा उमेदवार आणि लेखी परीक्षेला उपस्थित राहणारा उमेदवार तोच असल्याची खात्री संगणकीय पद्धतीने केली जाते त्यामुळे गैर प्रकारांना पूर्णतः आळा बसणार आहे.

🔹 RFID (Radio Frequency Identification) चिप प्रणाली.
धावण्याच्या चाचणीत शंभर टक्के अचूकता आणण्यासाठी मैदानी धाव चाचणीदरम्यान प्रत्येक उमेदवाराच्या पायाला RFID चिप स्ट्रॅपद्वारे सुरक्षितपणे बांधली जाते. सदर RFID चिप मुळे
✔ अचूक वेळ नोंद.
धाव चाचणी सुरू होताच सेन्सर प्रणालीद्वारे उमेदवाराने पूर्ण केलेल्या अंतराची सेकंदागणिक डिजिटल नोंद होते. मानवी हस्तक्षेप टाळल्यामुळे वेळ मोजण्यात कोणतीही चूक राहत नाही.
✔ फेऱ्यांची स्वयंचलित मोजणी.
लांब पल्ल्याच्या धावण्यात प्रत्येक फेरीची नोंद स्वयंचलितपणे केली जाते.
✔ फसवणूक प्रतिबंध.
प्रत्येक RFID चिप उमेदवाराच्या विशिष्ट नोंदणी क्रमांकाशी जोडलेली असल्याने गैर प्रकारांना पूर्णतः आळा बसतो.

🔹 सीसीटीव्ही व डिजिटल नियंत्रण कक्ष.
भरती प्रक्रियेच्या संपूर्ण परिसरात उच्च क्षमतेचे CCTV कॅमेरे बसविण्यात आले असून, नियंत्रण कक्षातून थेट निरीक्षण केले जाते.
प्रत्येक टप्प्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग
पारदर्शकतेसाठी ठोस पुरावा उपलब्ध आहे. यामुळे प्रक्रिया अधिक विश्वासार्ह व शंकामुक्त बनली आहे.
🔹 संगणकीकृत डेटा व्यवस्थापन व त्वरित निकाल.
सर्व उमेदवारांची माहिती, गुणांकन, वेळ नोंदी व निकाल पूर्णतः संगणकीकृत प्रणालीद्वारे हाताळले जातात. त्यामुळे कसल्याही प्रकारची त्रुटीची शक्यता संपवून धाव चाचणी पूर्ण होताच वेळेची त्वरित माहिती उपलब्ध होते.

पारदर्शकतेचा दृढ संकल्प.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्हा पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व गुणवत्ताधारित बनवली आहे. बायोमेट्रिक ओळख प्रणाली, RFID तंत्रज्ञान, CCTV मॉनिटरिंग व संगणकीकृत डेटा व्यवस्थापन या सर्व उपाययोजनांमुळे भरती प्रक्रियेत गैरप्रकारांना पूर्णपणे आळा बसला असून लातूर पोलीस दलाची ही तंत्रज्ञानाधारित भरती प्रक्रिया भविष्यातील प्रशासनासाठी आदर्श ठरत आहे.

0
0 views

Comment