logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

अमळनेरला आज भूमी सुपोषण चळवळ जनजागर महाशोभायात्रा आयोजन-नियोजनाची बैठक खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार अनिलदादा पाटील यांची उपस्थिती लाभणार

अमळनेरला आज भूमी सुपोषण चळवळ जनजागर
महाशोभायात्रा आयोजन-नियोजनाची बैठक


खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार अनिलदादा पाटील यांची उपस्थिती लाभणार

अमळनेर प्रतिनिधी : अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी अमळनेर शहरात ‌‘माझा-संकल्प-भूमी सुपोषण‌’ चळवळ जनजागर महाशोभायात्रा काढण्याचे सुनिश्चित केले आहे. त्यासाठी येथील श्री मंगळग्रह मंदिरात रविवार, दि. 15 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता आयोजन-नियोजनाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, आमदार अनिलदादा पाटील अध्यक्षस्थानी असतील.
अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने काळाची गरज असलेली भूमी सुपोषण चळवळ देशभर प्रचारीत व प्रसारीत करण्याचे सुनिश्चित करण्यात आले आहे. ‌‘मेरा संकल्प-भूमी सुपोषण‌’ या चळवळीचा शुभारंभ श्री भूमी मातेच्या वाढदिवशी अर्थात वर्ष प्रतिपदा व गुढीपाडवा-हिंदू नववर्षारंभ अर्थात गुरुवार, दि. 19 मार्च 2026 रोजी होणार आहे. त्यासाठी माननीय केंद्रीय कृषिमंत्री ना. श्री. शिवराजसिंहजी चौहान अमळनेर येथे श्री मंगळग्रह मंदिरात येणार आहेत.
सदर ऐतिहासिक उपक्रम नितांत सुंदर, नियोजनबद्ध, अत्यंत आखीव-राखीव असावा, अशी आमची मनस्वी इच्छा असल्याने आपल्यासारख्या महानुभावांचे मार्गदर्शन लाभावे, यासाठीच या आयोजन-नियोजन बैठकीचे आयोजन केले आहे. समाजातील सर्व क्षेत्रांतील मान्यवर व माता-भगिनींनी अधिकाधिक संख्येने या बैठकीस आवर्जून उपस्थिती द्यावी, असे आवाहन अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांनी केले आहे.
दरम्यान, सदर दिवशी महाशिवरात्र आहे. त्यामुळे बैठकीनंतर सर्वांसाठी उपवासाच्या भोजन-महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

8
437 views

Comment