वाशिम : दोन दुचाकी वाहनांची
वाशिम : दोन दुचाकी वाहनांची
समोरासमोर धडक होऊन एक जण ठार झाल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:४० वाजताच्या सुमारास घडली. वाशिम ग्रामीण पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, गोपाल रामकिसन खरात (३०) हे त्यांच्या दुचाकी वाहनाने प्रवास करीत होते. सावरगाव बर्डे गावानजीकच्या महादेव मंदिरासमोर समोरून येणाऱ्या दुचाकी वाहनास त्यांची धडक बसली. या घटनेत खरात यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला