दिव्यातील एजंट आणि कथाकथित बिल्डरा कडून गोरगरीब नागरिकांची फसवणूक
दिवा (ठाणे) : दिव्यातील नारायण भगत नगर येथे बिल्डर आणि एजंटने अनेक नागरिकांना गंडा घातल्याचा प्रकार आज समोर आला असून नागरिकांनी घर बुक करूनही त्यांना घराचा ताबा न देता बिल्डर आणि त्याच्या भागिदाराने अनेक जणांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त कळवा येथे लेखी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
कथाकथित बिल्डर नामे चंदन पाटील यांच्या संगनमताने तसेच हाताशी असणारे अमित सरवणकर यांनी भाग्यम इंटरप्राईजेस या नावाने स्वतःचे कार्यालय थाटलेले असून आपण बिल्डरचा भागीदार असल्याचे भासवत अनेक गुंतवणुकदारांची फसवणूक केली असल्याचे म्हटले जाते.
तक्रारदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार बिल्डरच्या संगनमताने दिवा पूर्व येथील नारायण भगत नगर येथील बांधकाम चालू असलेल्या इमारतीमध्ये कमी पैशात तुम्हाला रूम घेऊन देतो असे सांगून विश्वास संपादन करत हेमंत आत्माराम पंदेरे २ लाख ४३ हजार, सुमित आत्माराम पंदेरे २ लाख यांनी गरजेपोटी घर बुक करनेकामी म्हणून रक्कम अदा केली होती. याबाबतच्या रीतसर पावत्याही देण्यात आल्या होत्या.
बराच कालावधी उलटूनही बिल्डर आणि एजंट यांनी पीडित हेमंत आत्माराम पंदेरे, सुमित आत्माराम पंदेरे यांना खोलीचा ताबा दिला नाही. दीर्घकाळ खोलीचा ताबा मिळत नसल्याने बिल्डर चंदन पाटील यांना या बाबत विचारणा केली असता, मला तुमचे पैसे मिळाले नाहीत... मी माझ्या नोंद वहीत बघून सांगतो... अश्या प्रकारची कारणे देऊन वारंवार टाळाटाळ करू लागले. सुमित आणि त्यांचे भाऊ हेमंत यांनी पैश्याचा तगादा करण्यास सुरुवात केली.
आता हा विषय वारंवार आज, उद्यावर चालढकल करत असल्याचे तक्रार दाराने केलेल्या लेखी पत्राद्वारे उघड झाले आहे आहे.
दिव्यात ह्या अगोदर हेमंत आत्माराम पंदेरे, सुमित आत्माराम पंदेरे, यांच्यासह जतीन भानुशाली, अल्पेश कदम, मितेश कळमबट्टे व अन्य काहींनीदेखील या इमारतीमध्ये वेगवेगळ्या रकमा देऊन खोली बुक केली होती. पैसे घेऊनही यातील कोणालाच खोलीचा ताबा मिळाला नाही. त्यानंतर काही कोकणी बांधवांना चाळीमध्ये कमी पैशात खोली देण्याचे आश्वासन देत अमित सरवणकर यांनी लाखो रुपयांचा गंडा लावला.
बिल्डर आणि एजंट यांनी कधी बिल्डरांच्या छत्रछायेखालील दुसऱ्यांच्या बांधलेल्या चाळी दाखवून तर कधी खाडी किनारी बांधलेल्या खोल्या दाखवून अनेक गुंतवणूकदारांचे पैसे लुबाडले असल्याचे बोलले जात असून अद्याप कोणालाही पैसे परत केले नाहीत असे समजते.
सदर प्रकरणी सहाय्यक आयुक्त (दिवा प्रभाग समिती) शिवप्रसाद नागरगोजे तसेच पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले असून याबाबत प्रशासनाकडून कश्या प्रकारे पीडिताला न्याय देण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.