logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पिंपळगाव सराई येथे धाडसी चोरी; ९२ हजारांचा मुद्देमाल लंपास

पिंपळगाव सराई येथे धाडसी चोरी; ९२ हजारांचा मुद्देमाल लंपास
​बुलढाणा: तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे अज्ञात चोरट्यांनी एका घरावर डल्ला मारून सुमारे ९२,२०० रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी पहाटे घडली. याप्रकरणी रायपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​विशाल रामलाल शिंगणे (३४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १५ सप्टेंबरच्या पहाटे २ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. कशाचा तरी आवाज आल्याने आणि शेजाऱ्यांनी आरडाओरड केल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. घराची पाहणी केली असता, मागील शेतात दोन लोखंडी पेट्या उचकटलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ९२,२०० रुपयांचा माल चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
​ठाणेदार निलेश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका कैलास खारडे व पोका काझी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

51
933 views

Comment