logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मुरुड जंजिरा इथील खोकरी ते अगरदांडा रस्ता धोकादायक अपघाताची शक्यता वाढली प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज



( अगरदांडा / साकिब गजगे) मुरुड जंजिरा चे खोकरी ते आगरदांडा या महत्त्वाच्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडाझुडपांमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र वाढलेल्या झुडपांमुळे वाहन चालकांना समोरून येणारी वाहने वेळेत दिसत नसल्याने जीवितास धोका निर्माण झाला आहे.

विशेषतः रस्त्यावरील वळणाच्या ठिकाणी ही समस्या अधिक गंभीर होत असून दुचाकीस्वार, शाळकरी विद्यार्थी तसेच स्थानिक मासेमारी व्यवसायाशी संबंधित वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी झुडपे रस्त्यावर झुकल्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून वाहन चालवणे धोकादायक बनले आहे.

स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या समस्येबाबत अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)मुरुड जंजिरा कडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

नागरिकांनी प्रशासनाला तातडीने झाडाझुडपांची छाटणी करून रस्ता सुरक्षित करण्याची मागणी केली आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी नागरिकांची एकमुखी मागणी आहे.

14
517 views

Comment