logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पिंपळगाव सराईत धाडसी चोरी; ९२ हजारांचा ऐवज लंपास

पिंपळगाव सराईत धाडसी चोरी; ९२ हजारांचा ऐवज लंपास
Aima media news network
सादिक शाह
​बुलढाणा (दि. १५ फेब्रुवारी): जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथे पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ९२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रायपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​नेमकी घटना काय?
​फिर्यादी विशाल रामलाल शिंगणे (वय ३४, रा. पिंपळगाव सराई) हे दि. १५ फेब्रुवारी रोजी पहाटे आपल्या कुटुंबासह घरात झोपलेले होते. अंदाजे पहाटे २.०० वाजेच्या सुमारास घरात काही वस्तू पडल्याचा आवाज आल्याने शिंगणे कुटुंबीयांना जाग आली. याच वेळी शेजाऱ्यांनी देखील आरडाओरड केल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला.
​पत्राच्या पेट्या शेतात आढळल्या
​चोरटे पळून गेल्यानंतर घराची पाहणी केली असता, घरातील दोन लोखंडी पत्राच्या पेट्या गायब असल्याचे लक्षात आले. शोध घेतला असता या पेट्या घरामागील शेतात फेकून दिलेल्या अवस्थेत मिळून आल्या. चोरट्यांनी या पेट्यांमधील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ९२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
​पोलीस तपास सुरू
​या घटनेबाबत विशाल शिंगणे यांनी रायपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार निलेश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका कैलास खारडे आणि पोका काझी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

12
291 views

Comment